Mapusa Attack: पार्किंगवरून वाद चिघळला! कामगारांवर चाकूने हल्ला; दोघे गंभीर जखमी, हल्लेखोर पसार

Mapusa Crime News: म्हापसा बाजारात पार्किंगवरून झालेल्या वादानंतर दोन पार्किंग अटेंडंट्सवर हल्ला करण्यात आला. या घटनेत प्रकाश तळवे आणि संदीप कुमार हे दोघे गंभीर जखमी झाले.
Mapusa Crime
Mapusa Attack Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: म्हापसा बाजारात पार्किंगवरून झालेल्या वादानंतर दोन पार्किंग अटेंडंट्सवर हल्ला करण्यात आला. या घटनेत प्रकाश तळवे आणि संदीप कुमार हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेननंतर म्हापसा बाजारात खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी कामगारांवर चाकू आणि गाडीच्या किल्ल्यांचा वापर करून हल्ला केला. या हल्ल्यात प्रकाश तळवे गंभीर जखमी झाले तर संदीप कुमार यांनाही दुखापत झाली आहे. दोन्ही जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

Mapusa Crime
Goa Crime: मडगावात 'गन-पॉइंट' ड्रामा! एका मुलीसाठी दोन तरुण आमनेसामने, वाद चिघळला आणि काढली बंदूक

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला अगदी अचानक झाला. या घटनेनंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. म्हापसा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची माहिती देण्यात आली.

Mapusa Crime
UP Crime: आंतरराज्य सायबर टोळीचा पर्दाफाश! गोव्यातून चालवले जात होते ऑनलाइन बेटिंग, तिघांना अटक

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली आणि आरोपींचा शोध घ्यायला सुरु केला आहे. म्हापसा बाजारात ही घटना घडल्यानंतर नागरिकांचा गोंधळ उडाला. बाजारातील पार्किंग व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सुरक्षा उपाय योजनेची गरज असल्याचे स्थानिकांनी मत व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com