वेर्ला-काणका येथील खूनप्रकरणी संशयिताला बेड्या

पाच दिवसात छडा; म्हापसा पोलिसांनी ओडिशा येथून केली अटक
murder accused arrested from Odisha
murder accused arrested from OdishaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : मनोज बाम (30) याच्‍या खूनप्रकरणी पसार असलेला संशयित सूरज तीर्थ चंदन (ओडिशा) याला म्हापसा पोलिसांनी ओडिशा येथून अटक केली. अवघ्या पाच दिवसांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. 15 मे रोजी फ्रेतसवाडा-वेर्ला, काणका येथे कौटुंबिक वादातून ही घटना घडली होती.

मनोजवर प्राणघातक हल्ला करून संशयित सूरज गावी पसार झाला होता. घटनेच्या दिवशी मनोज याच्यासह संशयिताचे कुटुंबीय खोलीत झोपले होते. ही संधी साधून सूरज याने बागकामासाठी वापरण्यात येणाऱ्या पिकासवजा हत्याराद्वारे मनोजच्या डोक्यावर वार केला होता. या हल्ल्यात तो रक्तबंबाळ होऊन बेशुद्धावस्थेत पडला. हल्ल्यानंतर संशयित पसार झाला होता.

murder accused arrested from Odisha
शेतजमिनीचे बिगरशेतीत रुपांतर करणाऱ्यांची गय नाहीच : विश्वजीत राणे

दरम्यान, जखमी अवस्थेत मनोजला उपचारासाठी जीएमसीत दाखल करण्यात आले होते. पण तेथे त्‍याचा मृत्‍यू झाला. दुसरीकडे संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली होती.

संशयित आपल्या मूळ गावी गेल्याचे समजताच त्याला तेथे जाऊन अटक करण्‍यात आली. पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश गडकर पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com