म्हापसा पालिका मार्केट इमारतीला हवी दुरुस्ती

गळतीमुळे छप्पर खराब : सातत्याने काँक्रिटचे तुकडे पडत असल्याच्या घटना
Mapusa Municipal Market Building
Mapusa Municipal Market BuildingDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : जवळपास पाच दशक जुन्या म्हापसा पालिका मार्केटच्या इमारतीला सध्या तातडीच्या दुरुस्तीची गरज व्यक्त होत आहे. गळतीमुळे इमारतीचे छप्पर खराब होत असून, काँक्रिटचे तुकडे पडत असल्याच्या घटना गेल्या काही वर्षांपासून नोंदवल्या जात आहेत.

म्हापसा मार्केट हे केवळ शुक्रवारच्या बाजारासाठीच नाही तर त्याच्या रचनेमुळेही पर्यटकांना आकर्षित करते. कालांतराने या संरचनेकडे दुर्लक्ष झालेले दिसते.परिणामी, गेल्या दहा वर्षांपासून संपूर्ण संरचनेत पाण्याची गळती होत आहे. याव्यतिरिक्त खांबाजवळ उंदरे पोखरत असल्याची समस्याही उद्‌भवत आहे. त्यामुळे खांबाच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

Mapusa Municipal Market Building
नानेली धबधबा येथे रविवारी पावसाळी पदभ्रमण मोहिम

गेल्या काही वर्षांपासून 50 वर्षांहून जुन्या पालिका मार्केट ब्लॉककडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. आम्ही म्हापसा पालिकेला मार्केटच्या जुन्या ब्लॉकची दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे. या जुन्या ब्लॉकची छत उघडी असल्याने पाणी गळती होते. त्यामुळे आम्ही सध्याच्या संरचनेवर दुसरे छप्पर उभारण्याची मागणी केली आहे; जेणेकरून गळती थांबवता येईल. ज्यामुळे पालिकेच्या मार्केट इमारतीचे आयुष्य आणखी वाढेल, असे म्हापसा व्यापारी संघटनेचे सहसचिव पांडुरंग सावंत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com