Mapusa Municipality: म्हापसा पालिकेच्या बैठकीत नगराध्यक्ष-नगरसेवकांमध्ये जोरदार 'खडाजंगी'; दुकान भाडेपट्टी, नूतनीकरणावरुन घमासान!

Mapusa municipality Meeting: म्हापसा पालिकेच्या बैठकीत दुकान भाडेपट्टी, नूतनीकरण तसेच हस्तांतरण विषयांवरुन नगरसेवकांची नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांसोबत जोरदार खडाजंगी झाली.
Mapusa Municipality: म्हापसा पालिकेच्या बैठकीत नगराध्यक्ष-नगरसेवकांमध्ये जोरदार 'खडाजंगी'; दुकान भाडेपट्टी, नूतनीकरणावरुन घमासान!
Mapusa municipality MeetingDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा पालिकेच्या बैठकीत दुकान भाडेपट्टी, नूतनीकरण तसेच हस्तांतरण विषयांवरुन नगरसेवकांची नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांसोबत जोरदार खडाजंगी झाली. नगराध्यक्षांच्या नातेवाईकांची दोन वेगवेगळी दुकाने एकत्रितपणे हस्तांतरित करण्याचा बेकायदा प्रकार नगराध्यक्ष व मुख्याधिकारी करत असल्याचा दावा करीत नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी याला हरकत घेतली. तब्बल सात तासपेक्षा अधिक वेळ चाललेल्या ही बैठक रात्री उशिरा तहकूब करुन 18 नोव्हेंबरला बैठक घेण्याचे ठरण्यात आले.

दरम्यान, दुकानांचा हा विषय आणून एकप्रकारे मूर्खपणा केल्याचा आरोप भिवशेट यांनी करुन याला आपले लेखी हरकतपत्र नगराध्यक्षांना सादर केले. मात्र नगराध्यक्षांनी लेखी हरकतपत्र घेण्यास नकार दिला. यावेळी भिवशेट यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत नगरसेवक अ‍ॅड. शशांक नार्वेकर व विराज फडके यांनी मुख्याधिकाऱ्यांना घेरले. त्यानंतर आपल्या नातेवाइकांचा विषय अजेंड्यावर चर्चेला आल्याने नगराध्यक्षांनी या मुद्द्यावरुन स्वतःला गैरहजर ठेवत, बैठकीची पुढील सूत्रे उपनगराध्यक्ष सुशांत हरमलकर यांच्याकडे सुपूर्द केली.

Mapusa Municipality: म्हापसा पालिकेच्या बैठकीत नगराध्यक्ष-नगरसेवकांमध्ये जोरदार 'खडाजंगी'; दुकान भाडेपट्टी, नूतनीकरणावरुन घमासान!
Mapusa Municipal Council: स्वच्छतागृह पाडणाऱ्यांवर तीन दिवसांत कारवाई; म्हापसा नगराध्यक्ष

उपनगराध्यक्ष हरमलकर यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नगरसेवक भिवशेट यांचे हरकतपत्र आपण स्वीकारत नसल्याचा शेरा मारत, ते हरकतपत्र भिवशेट यांना परत दिले. त्यानंतर भिवशेट यांनी दत्ताराम कृष्णा बिचोलकर यांनी त्यांच्या जुन्या मार्केटमधील (अलंकार थिएटर) दुकान हस्तांतराची फाइल मागविली व हे एक दुकान नसून प्रत्यक्षात दोन दुकाने असल्याचा प्रकार पालिका मंडळाच्या नजरेस आणला. विराज कृष्णा बिचोलकर व दत्ताराम कृष्णा बिचोलकर यांच्या नावावरील ही दुकाने थेट एकत्रित करण्यात आली आणि ती मंजुरीसाठी पालिका बैठकीसमोर ठेवली गेली होती, असा दावा भिवशेट यांनी बैठकीसमोर केला.

Mapusa Municipality: म्हापसा पालिकेच्या बैठकीत नगराध्यक्ष-नगरसेवकांमध्ये जोरदार 'खडाजंगी'; दुकान भाडेपट्टी, नूतनीकरणावरुन घमासान!
Mapusa Municipal Council: म्हापसा पालिकेच्या तिजोरीत खडखडाट! विकासकामे थांबली

आमदाराचा प्रस्ताव मंजूर

सेंट झेवियर कॉलेजचा मैदानाचा आयडीएमटी योजनेअंर्तगत विकास करण्याच्या आमदार जोशुआ डिसोझा यांनी मांडलेल्या प्रस्तावावर बैठकीत चर्चा झाली. यावेळी समान मतदान झाल्याने नगराध्यक्षांनी होकाराच्या बाजूने मतदान केल्याने हा ठराव मंजूर झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com