Mapusa: म्हापसा पालिकेचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर, 9 कोटींची तरतूद; उद्यानांच्या देखभालीसाठी 1 कोटी रुपये

Mapusa Muncipal: पालिका मंडळाच्या आजच्या विशेष बैठकीत २०२५-२०२६ या आर्थिक वषार्साठीचे ९ कोटी रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक आवाजी मतदानातून एकमताने मंजूर करण्यात आले.
Mapusa Muncipal
Mapusa MuncipalDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: पालिका मंडळाच्या आजच्या विशेष बैठकीत २०२५-२०२६ या आर्थिक वषार्साठीचे ९ कोटी रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक आवाजी मतदानातून एकमताने मंजूर करण्यात आले. यावर्षी पालिकेने नवीन उद्यान विकसित करण्यासाठी आणि विद्यमान उद्यानांच्या देखभालीसाठी १ कोटी रुपयांची विशेष तरतूद केली आहे. तसेच प्रभागांचा विकास करण्यासाठीही तरतूद केली आहे.

नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली म्हापसा पालिका मंडळाची विशेष बैठक झाली. यावेळी मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट उपस्थित होते. नगरसेवक डॉ. तारक आरोलकर आणि विकास आरोलकर वगळता, इतर सर्व नगरसेवक हजर राहिले. पालिकेचे एकूण अंदाजपत्रक १०१.६६ कोटींचे आहे.

Mapusa Muncipal
Leopard In Goa: डिचोलीत बिबट्याची दहशत, भर लोकवस्तीत वावर; विद्यार्थ्यांसह ज्येष्ठांच्या जीवाला धोका

त्यात ४५.१० कोटींचा महसूल तर ४४.१५ कोटींचा एकूण खर्च दाखविला आहे. पालिका क्षेत्रातील उद्यानांच्या विकासासाठी १ कोटी रुपयांची विशेष तरतूद करावी, अशी सूचना आनंद भाईडकर यांनी केली.

लटकणाऱ्या केबलचा लोकांना त्रास

पालिकेकडून पालिका संचालकांच्या मान्यतेविना स्वच्छता शुल्काची वसुली केली जात असल्याच्या कारणावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. सत्ताधारी गटासह विरोधी गटानेही अनेक दुरुस्त्या सुचविल्या. केबल तसेच इंटरनेटच्या लोंबकळणाऱ्या वाहिन्यांमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा नगरसेवक शशांक नार्वेकर यांनी मांडला. तसेच त्यांच्याकडून एका महिन्याचे भाडे वसूल करून पालिकेचा महसूल वाढविण्याची सूचना त्यांनी केली.

Mapusa Muncipal
Goa Sexual Assault Case: बाबूश मोन्सेरात यांची 9 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; 2016 च्या लैंगिक छळ प्रकरणात न्यायालयाचा दिलासा

पे-पार्किंग होणार लवकरच सुरू

पे-पार्किंगसाठी केलेल्या तरतुदीवर हरकत घेण्यात आली. आराम सोडा, युनियन फार्मसीचा परिसर तसेच चणे विक्रेते परिसरातील पे पार्किंग मागील काही वर्षांपासून बंद असल्याने महसुलावर परिणाम होत असल्याचे शुभांगी वायंगणकर यांनी सांगितले. तेथे लवकरच पे पार्किंग लागू केले जाणार आहे. त्यासाठी परिसराची आखणी करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्षांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com