Mapusa: फटाक्‍यांचा साठा मर्यादित प्रमाणातच ठेवा; विक्रेत्यांना सूचना

म्हापसा नगरपालिकेची चतुर्थीनिमित्त आपत्कालीन आढावा बैठक
Goa Mapusa Municipality
Goa Mapusa MunicipalityDainik Gomantak

सुरक्षिततेच्‍या कारणास्तव म्हापसा शहरातील फटाक्यांच्या विक्रीवर मर्यादा घालण्‍यात आल्‍या आहेत. स्टॉल्समध्येही मर्यादित प्रमाणातच साठा ठेवावा लागणार आहे.

सोमवारी सायंकाळी म्‍हापसा नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली गणेश चतुर्थीनिमित्त घेण्‍यात आलेल्‍या तयारीच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, नगरसेवक, म्हापसा अग्निशमन दल, साबांखा, जलस्त्रोत, वीज, पोलिस, वाहतूक पोलिसांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

फटाकेविक्रेत्यांची सोय टॅक्सीस्थानकासमोर केली जाईल. अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीकृष्ण पर्रीकर यांनी फटाकेविक्रेत्यांना मार्गदर्शक तत्वे लागू केल्याची माहिती दिली.

Goa Mapusa Municipality
MP Shripad Naik Video: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक अभंगात तल्लीन होतात तेव्हा... व्हिडिओ

लोकांची सुरक्षा अत्यंत महत्वाची असल्याचा मुद्दा त्‍यांनी उपस्थित करून फटाके स्टॉल्सवर मर्यादा लागू कराव्यात अशी सूचना केली असता, ती मान्य करण्‍यात आली.

तसेच आपत्कालीन वेळेत आगीची घटना घडल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यास उपाययोजना हाती घेण्याची सूचनाही करण्याचे निश्चित केले.

म्हापसा पालिका क्षेत्रात गणेश विसर्जनाची सहा ठिकाणे आहेत. त्यात म्हापसा नदीचा परिसर म्हणजे तारीकडे हे विसर्जनाचे मुख्य स्थळ होय. या परिसरात अग्निशामक दलाचे वाहन विसर्जनाच्या वेळी ठेवण्याचे निश्‍चित करण्यात आले.

२४ तास असणार पोलिस गस्‍त

  1. बाजारपेठेतील सार्वजनिक गणेशोत्सवासोबतच अन्‍य ठिकाणच्‍या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी २४ तास पोलिस तैनात ठेवले जातील. तसेच गस्त असेल, अशी माहिती पोलिसांतर्फे देण्‍यात आली. वाहतूक व्यवस्थाही सुरळीत राहील यासाठी प्रयत्‍न करण्‍याचे आश्‍‍वासन देण्‍यात आले.

  2. वाहनांची गर्दी टाळण्यासाठी हळदोणा टॅक्सीस्थानकाकडील वाहतूक सिग्नल यंत्रणा तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्‍यात आला. तसेच कदंबस्थानकावर पार्किंगची व्यवस्था केली जाणार असून त्यासाठी महामंडळाला पत्र पाठवण्यात आल्याचे मिशाळ यांनी सागितले. पथदीपांची दुरुस्ती, रस्त्यांची डागडुजी करण्याची सूचना संबंधित खात्याला करण्‍यात आली.

Goa Mapusa Municipality
Goa Express: गोवा एक्सप्रेसमधील 8 प्रवाशांना अन्नातून विषबाधा? बेळगाव जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com