म्हापसा नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 7 मधील नगरसेवक तारक आरोलकर यांचा ओबीसी दाखला अवैध ठरविल्याने नगरविकास खात्याच्या संचालकांनी नगरसेवक म्हणून अपात्र घोषीत केले.
रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक सात मधील नगरसेवक पदासाठीच्या पोटनिवडणूकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. पोटनिवडणूकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
नगरपालिका कायदा कलम 50 अंतर्गत प्रभाग 7ची रिक्त जागा भरण्याची सूचना पत्राद्वारे नगरपालिका खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी राज्य निवडणूक आयोगाला केली होती.
तारक आरोलकर अपात्र झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. म्हापसा पालिकेच्या प्रभाग 7 मध्ये जुलै महिन्यात पोटनिवडणूक होणार आहे.
ओबीसी राखीव असलेला म्हापसा पालिका प्रभाग 7 मधून तारक आरोलकर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. माजी नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो यांनी समाजकल्याण विभागाच्या तीन सदस्यीय छाननी समितीकडे आरोलकर यांच्या जातीच्या दाखल्याबाबत तक्रार केली होती.
समाज कल्याण विभागाच्या छाननी समितीच्या निर्देशानंतर आरोलकर यांचा जातीचा दाखला बार्देश उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी रद्द केला होता. यानंतर आरोलकर यांना अपात्र ठरविण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.