Mapusa: धो धो पावसात गटारींची दुरुस्ती! म्हापसा पालिकेचा अजब कारभार; स्थानिक, विक्रेते संतप्त

Mapusa Drainage Repair: १८ प्रभाग मिळून म्हापसा मतदारसंघ आहे. पण येथे गटार व्यवस्था कोलमडलेली असल्याने पावसाचे पाणी रस्त्याच्या बाजूला असलेली दुकाने व घरांमध्‍ये जाऊन लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
Drainage repair in Mapusa
Drainage maintenance in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

बार्देश: मान्‍सूनपूर्व कामांचा समावेश असलेल्‍या गटारांची दुरुस्‍ती भरपावसात करण्‍यात येत असल्‍यामुळे म्‍हापशातील व्यापारी आणि विक्रेत्‍यांनी संताप व्‍यक्त केला आहे.

वेळेवर कामे होत नसल्यामुळच म्हापसा मतदारसंघ अविकसित राहिल्याची टीका गोवा राज्य शिवसेना प्रमुख जितेश कामत यांनी केली आहे. म्हापसा पालिका २० प्रभागांची असून त्यातील दोन प्रभाग हे हळदोणा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

Drainage repair in Mapusa
Goa Rain: पावसाचे थैमान! देवस्थानची कमान कारवर कोसळली, चिंचेचे झाड उन्मळले; जनजीवन विस्कळीत

त्यामुळे १८ प्रभाग मिळून म्हापसा मतदारसंघ आहे. पण येथे गटार व्यवस्था कोलमडलेली असल्याने पावसाचे पाणी रस्त्याच्या बाजूला असलेली दुकाने व घरांमध्‍ये जाऊन लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. ही समस्‍या वेळीच सोडविणे गरजेचे आहे, असे कामत म्‍हणाले.

Drainage repair in Mapusa
Goa Rain: गोव्यात मान्सूनचा 'धमाका'! एका दिवसात 103.8 मि.मी. पावसाची नोंद; 16 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

म्हापसा पालिकेने पावसापूर्वीची तयारी म्हणून काही गटारांची साफसफाई केली आहे. परंतु ज्या गटारांचे बांधकाम नव्याने सुरू करण्यात आले आहे, त्यातील काही ठिकाणची गटारे अर्धवटच ठेवण्यात आली आहेत. तर, स्वच्छता केलेल्या गटारांतील माती, चिखल, दगड काढले खरे,पण ते पुन्हा गटारावरच ठेवण्यात आले आहेत. त्‍यामुळे आता पावसाळ्‍यात मोठी समस्‍या निर्माण होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com