Mapusa News : साळगावातील ‘सायलंट व्होटर’ कोणाच्या बाजूने? उत्‍सुकता वाढली

Mapusa News : भाजपचा वरचष्‍मा; बहुजन समाजाची भूमिका ठरू शकते निर्णायक
Voting
VotingDainik Gomantak

योगेश मिराशी

म्हापसा बार्देश तालुक्यातील साळगाव विधानसभा मतदारसंघ हा साळगाव, गिरी, सांगोल्डा, पिळर्ण-मार्रा, नेरुल व रेईस-मागूश या सहा पंचायत क्षेत्रांत मोडतो. या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असून सध्‍या केदार नाईक हे लोकप्रतिनिधीत्व करत आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला साळगावमधून २४८४ मतांची आघाडी मिळाली होती. ही आघाडी भाजपला पुन्हा मिळवून देण्याची जबाबदारी आता पक्षाचे युवा नेतृत्व असलेल्या केदार नाईक यांच्या खाद्यांवर आहे.

साळगाव मतदारसंघात बहुजन समाजाचे जवळपास ६० टक्के मतदार आहेत. मात्र, अलीकडे बहुजन समाजाच्या रुद्रेश्वर मंदिराच्या वादानंतर या समाजाची भूमिका निर्णायक राहील. तसेच हा मतदारसंघ बदलासाठी ओळखला जातो.

Voting
Kolhapur-Goa: कोल्हापूरच्या महिलेने पोटच्या मुलीला एक लाख रुपयांना गोव्यात विकले, नोटरीद्वारे झाला व्यव्हार

सुरूवातीच्या काळात माजी मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसोझा यांनी या मतदारसंघावर वर्चस्व राखले. मात्र, भाजपतर्फे दिलीप परुळेकरांनी त्यांची ही राजकीय मक्तेदारी मोडीत काढली. कालांतराने, गोवा फॉरवर्ड पक्षाने या मतदारसंघावर पकड मिळविली खरी, मात्र पुन्हा विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने साळगाव आपल्या बाजूने केला.

परंतु केदार नाईक यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपची साथ धरली. त्यामुळे आता साळगाव मतदारसंघ भाजपकडे आहे. विशेष म्‍हणजे ख्रिश्चन समाजाचे १५ टक्के मतदार येथे आहेत.

या मतदारसंघावर भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांची पकड असली तरी, सद्य:स्थितीत भाजपने बऱ्या‍पैकी वर्चस्‍व स्‍थापित केले आहे. भाजपचे आमदार केदार नाईक, माजी आमदार जयेश साळगावकर व माजी मंत्री दिलीप परुळेकर यांच्या रुपाने खंबीर व मोठ्या नेत्‍यांची फौज भाजपकडे आहे. या पक्षाने परुळेकरांना बाजूला केले असले तरी आजही आपण भाजपच्या बाजूने असल्याचे ते प्रत्येकवेळी सांगत आले आहेत.

भाजप, आरजी, काँग्रेसचा प्रचार सुरू :

सध्‍या भाजप, काँग्रेस व ‘आरजी’ने साळगाव मतदारसंघात प्रचाराला सुरूवात केली आहे. प्रत्येकाने कोपरा बैठकांपासून आपले कार्यकर्ते तसेच मतदारसंघातील प्रमुख घटकांच्‍या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. सर्वांनी आपली राजकीय ताकद पणाला लावल्याचे दिसून येतेय. यात भाजप व आरजीने बऱ्यापैकी आघाडी घेऊन प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे.

केदार नाईक व जयेश साळगावकर यांच्यात सध्या राजकीय वर्चस्वासाठी चढाओढ सुरू आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांवर अप्रत्यक्ष टीका-टिप्पणी करताना दिसतात. त्‍यांचे मनोमीलन घडवून ते पक्षाच्या यशात रुपांतरित करण्याची जबाबदारी पक्षनेतृत्वावर असेल.

साळगावमधील ‘सायलंट व्होटर’ यावेळी महत्त्वाची भूमिका निभावतील व ते कोणाच्या बाजूने राहणे पसंत करतात, यावर उमेदवाराच्या आघाडीचे यश अवलंबून असेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्‍यान, या मतदारसंघावर कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचीही पकड आहे व हीसुद्धा भाजपसाठी जमेची आहे.

Voting
Goa Politics: अनुल्‍लेखाने खलपांना इशारा; मुख्यमंत्री म्हणाले, ‘म्‍हापसा अर्बन’ची फाईल पुन्‍हा उघडू

काँग्रेसकडे वीरेंद्र शिरोडकर, तुलियो डिसोझा, कार्यकर्ते

काँग्रेसबाबत बोलायचे झाल्‍यास उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर तसेच तुलियो डिसोझा यांच्यासारखे नेते या पक्षाकडे आहेत. शिरोडकर हे बऱ्यापैकी या मतदारसंघात सक्रिय दिसतात. साळगाव काँग्रेस गटसुद्धा सक्रिय आहे.

त्यामुळे मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात कुठल्या पक्षास यश मिळते हे पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरेल. कारण सद्य:स्थितीत कुणीच समोर येऊन बोलताना दिसत नाहीत. मतदारांनी यावेळी ‘सायलंट’ राहणे पसंत केले आहे. त्‍यांची मते महत्त्‍वपूर्ण ठरणार आहेत.

केदार नाईक-जयेश साळगावकर यांच्‍यात वर्चस्वासाठी लढाई

केदार नाईक व जयेश साळगावकर यांच्यात सध्या राजकीय वर्चस्वासाठी चढाओढ सुरू आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांवर अप्रत्यक्ष टीका-टिप्पणी करताना दिसतात. त्‍यांचे मनोमीलन घडवून ते पक्षाच्या यशात रुपांतरित करण्याची जबाबदारी पक्षनेतृत्वावर असेल.

साळगावमधील ‘सायलंट व्होटर’ यावेळी महत्त्वाची भूमिका निभावतील व ते कोणाच्या बाजूने राहणे पसंत करतात, यावर उमेदवाराच्या आघाडीचे यश अवलंबून असेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्‍यान, या मतदारसंघावर कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचीही पकड आहे व हीसुद्धा भाजपसाठी जमेची आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com