Mapusa heavy rain: म्हापशात दाणादाण! मुसळधार पावसानं झोडपलं; 24 तासांत 4 इंच पाऊस, रस्ते पाण्याखाली

Mapusa: बुधवारी (ता.६) पहाटे पावसाने म्हापशात जोरदार पुनरागमन करत शहराला अक्षरशः झोडपून काढले. जोरदार कोसळधारामुळे म्हापसेकरांची पूर्णतः दैना उडाली. परिणामी, सखल भागांतील रस्त्यांवर पूरसदृश स्थिती निर्माण झाली.
Mapusa heavy rain
Mapusa heavy rainDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: बुधवारी (ता.६) पहाटे पावसाने म्हापशात जोरदार पुनरागमन करत शहराला अक्षरशः झोडपून काढले. जोरदार कोसळधारामुळे म्हापसेकरांची पूर्णतः दैना उडाली. परिणामी, सखल भागांतील रस्त्यांवर पूरसदृश स्थिती निर्माण झाली, ज्यामुळे नागरिकांना विशेषतः वाहनचालकांना अडचणी आल्या. ओहोळ व नाले दुथडी भरून वाहू लागले. शहरात २४ तासांत ४ इंच पावसाची नोंद झाली. या पावसामुळे म्हापसेकरांची चांगलीच तारांबळ उडाली.

पहाटे सुमारे दीड ते दोन तास कोसळलेल्या पावसामुळे खोर्ली-म्हापसा येथील उसपकर जंक्शन असो किंवा, मारुती मंदिराजवळील रस्ता, म्हापसा मार्केट, मरड परिसर, बोडगेश्वर मंदिराजवळील या सखल भागांतील सर्व मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

परिणामी, रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. म्हापसा शहरासह तालुक्यातील इतरत्र सखल भागांना पावसाचा तडाखा बसला. अनेक भागांत पाणी साचल्याने लोकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाला.

Mapusa heavy rain
Goa: पालिकांच्या विकासाला चालना देणारे विधेयक विधानसभेत सादर, 'अ' वर्ग नगरपालिकांची सदस्य संख्या 25 वरून 27 होणार

जोरदार पाऊस कोसळल्यानंतर, खोर्ली येथील उसपकर जंक्शनवरील रस्ते लगेच पाण्याखाली जातात. त्याचा फटका रहिवाशांना बसतो. येथील काँक्रीटचा नाला बांधल्यापासून ही स्थिती दरवर्षी गंभीर बनत चालली आहे.

स्थानिक आमदार तसेच नगरपालिकेला यावर अद्याप तोडगा काढता न आल्याने, लोकप्रतिनिधी व पालिका नेहमीच विरोधकांच्या आपसूक निशाण्यांवर येतात. म्हापसा पालिकेकडून मान्सूनपूर्व कामात झालेली कुचराई या पावसामुळे निर्मित समस्येला कारणीभूत ठरली. बाजारपेठ परिसरात देखील रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाणी साचल्याने, पूरसदृश स्थिती निर्माण झाली.

Mapusa heavy rain
Goa Assembly Session: महसूलबुडव्या कंपन्यांचा खाण लिलावात सहभाग, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची टीका

म्हापसेकरांना विनाकारण मन:स्ताप

श्री देव बोडगेश्वर मंदिराजवळील कळंगुटच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी भरले. परिणामी, या मार्गावर ये-जा करणाऱ्या लोकांना तसेच वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. कालांतराने, पावसाचा जोर ओसरल्यानंतर, येथील मार्गांवर साचलेले पावसाचे पाणी ओसरले. त्यापूर्वी पावसामुळे साचलेल्या साचलेल्या पाण्यामुळे म्हापसेकरांना विनाकारण मन:स्ताप सहन करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com