Mapusa Crime : पहिल्या पत्नीच्‍या हत्येप्रकरणी पतीस जन्मठेप; एक लाख दंड

MapusaCrime : समुद्रकिनारी सापडला होता मृतदेह : दुसऱ्या पत्‍नीचाही काढला होता काटा
Mapusa
MapusaDainik Gomantak

Mapusa Crime:

म्हापसा, उत्तर गोवा सत्र न्यायालयाने आसामच्या एका रहिवाशाला त्याच्या पहिल्या पत्नीच्या हत्येसाठी दोषी ठरवत, त्याला जन्मठेपेची सश्रम कारावासाठी शिक्षा सुनावली. तसेच १ लाख रुपये दंड ठोठावला.

ही रक्कम न भरल्यास तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. दरम्यान, आरोपी अमित कुमार दास याला यापूर्वी देखील त्याच्या दु‍सऱ्या पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, फेब्रुवारी २०१६ मध्ये हणजूण किनाऱ्यावर अज्ञात महिलेला मृतदेह असल्याची माहिती जीवरक्षकांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचनामा केला. या मृतदेहावर जखमांच्या खुणा होत्या. सुरूवातीला अनैसर्गिक मृत्यू म्हणून हे प्रकरण नोंद करण्‍यात आले होते. मात्र तपास व शिवविच्छेदनानंतर भादंसंच्या ३०२ कलम गुन्‍ह्यात जोडण्यात आले.

Mapusa
Goa Congress:...तर दोन दिवसांत गोव्यात काँग्रेसचे सरकार; विरोधीपक्षनेते आलेमाव यांनी सांगितले गणित

याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता आरोपीने त्याची पत्नी मनिदीपा दास ऊर्फ पूनम ऊर्फ मोनिदीपा दास हिला जबरदस्तीने समुद्रात नेले व तिचे डोके पाण्यात बुडवले. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. तपासानंतर पोलिसांनी जेएमएफसी न्यायालयासमोर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत दंडनीय गुन्ह्यासाठी आरोपपत्र दाखल केले.

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्‍या कलम ३०२ अन्वये आरोपीस जन्मठेपेची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच १ लाख रुपये दंड भरण्याचा निर्देश दिला व दंड न भरल्यास तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. तसेच मुलीला ५० हजार रुपये भरपाई देण्याचे निर्देशही देण्‍यात आले आहेत.

२०१६ मध्ये घडलेल्‍या या घटनेने संपूर्ण राज्‍यात खळबळ माजली होती. हणजूण किनाऱ्यावर मनिदीपा दास हिचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली व पती अमित कुमार दास याला ताब्‍यात घेतले.

प्रथम त्‍याने कानावर हात ठेवले, पण नंतर पोलिसी खाक्‍या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्‍याचा पूर्वइतिहासही पोलिसांनी पडताळून पाहिला होता.

अल्‍पवयीन मुलगी बालसुधारगृहात

सरकारी वकील ए. तळावलीकर यांनी न्‍यायालयात सांगितले की, हा पूर्वनियोजित गुन्हा असल्याने संशयितास जास्तीत जास्त शिक्षा ठोठावण्यात यावी. तसेच संशयिताला त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या हत्येसाठी देखील दोषी ठरवण्यात आले आहे.

या प्रकरणाचा निकाल रेकॉर्डवर ठेवला. तसेच आरोपी हा नेहमीचा अपराधी असल्याने त्‍याला कोणतीही क्षमा दाखवता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे, आरोपीला एक अल्पवयीन मुलगी आहे, जी सध्या बालसुधारगृहात आहे असे सांगून आरोपीचे वकील अ‍ॅड. एम. कळंगुटकर यांनी त्‍याच्‍या शिक्षेत कपात करण्‍याची मागणी न्‍यायलयाकडे केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com