FDA Raid: चकाचक पॅकिंग, भेसळयुक्त चॉकलेट्स; म्हापशात FDA ने केली पोलखोल! उत्पादकांवर कारवाईची शक्यता

Mapusa FDA raid: संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रिचर्ड नॉरोन्हा आणि टीमने १४ आस्थापनांची तपासणी केली
FDA action in Goa
FDA action in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने सोमवार (दि.१२) रोजी संध्याकाळी केलेल्या पाहणीच्या दरम्यान म्हापसा बाजार, काणका वेर्ला, कळंगुट आणि काणका बाजार परिसरात तपासणी केली. संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रिचर्ड नॉरोन्हा, स्नेहा गावडे, सुजाता शेटगावकर, अमित मांद्रेकर आणि लेनिन दे सा यांच्या टीमने १४ आस्थापनांची तपासणी केली.

या तपासणीत म्हापसा बाजारातून केळ्यांचे नमुने घेण्यात आले. शिवाय एका मोठ्या वितरकाकडून चॉकलेट म्हणून लेबल लावलेला आणि चुकीच्या पद्धतीने ब्रांडिंग केलेला मोठा साठा जप्त करण्यात आला असून, त्याचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत.

FDA action in Goa
FDA Raid: उत्तर गोव्यातील अन्न उत्पादन युनिट्सवर FDAचा मोठा छापा; कोलवळमधील 'दम-बिर्याणी' बंद

या चॉकलेटमध्ये मोठ्या प्रमाणात व्हेजिटेबल ऑइलचा वापर करण्यात आलाय आणि म्हणूनच या चॉकलेट्सच्या उत्पादकला देखील याचं उत्तर द्यावं लागणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही बाब गंभीर असल्याने FDA कडून याविरोधात गुन्हा देखील दाखल केला जाईल.

याव्यतिरिक्त, कळंगुटमधील २ आणि काणकामधील २ अशा ४ रेस्टॉरंटना कामकाज बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. यापैकी "मेस वाल्के एक्सप्रेस" या युनिटला अस्वच्छ परिस्थितीत कामकाज केल्याबद्दल २०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. FDA ची ही तपासणी मोहीम अन्न सुरक्षा आणि मानके राखण्यासाठी सुरू आहे.

रिचर्ड नॉरोन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हापसा येथील कारवाईत त्यांनी एकूण ११ खाद्य पदार्थांच्या दुकानांची चौकशी केली आणि यांमधील ७ दुकानं अस्वच्छ स्थितीत काम सुरू असल्याने बंद करण्यात आली आहेत. म्हापसा येथील एका बिर्याणीच्या दुकानात गोमांसाचा वापर होत असल्याची महिती समोर आली होती. गोमांस अन्न पदार्थांमध्ये वापरण्यावर बंदी नाही, मात्र मालकाकडून बिर्याणी बनवण्यात कोणते खाद्य पदार्थ वापरले गेलेत यांची माहिती दिली जाणं महत्वाचं असल्याचं नॉरोन्हा यांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com