Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak

FDA Raids: गोमंतकीयांच्या आरोग्याशी खेळू देणार नाही! राणेंचा इशारा, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

Vishwajit Rane: आरोग्य संरक्षणासाठी सरकार वचनबद्ध असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्यमंत्री विश्र्वजित राणे यांनी दिला आहे.
Published on

पणजी: गोमंतकीयांच्या आरोग्य संरक्षणासाठी सरकार वचनबद्ध असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्यमंत्री विश्र्वजित राणे यांनी दिला आहे. गोव्यात अन्न सुरक्षेविषयी विशेष मोहीम राबवली जात असून, कोणालाही गोमंतकीयांच्या आरोग्याशी खेळू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री राणे म्हणाले की, राज्यात अन्न सुरक्षेचे उल्लंघन रोखण्यासाठी आम्ही आमच्या प्रयत्नात आणखी गती आणली आहे. नियमित तपासण्या, लक्षित छापे आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. परवाना नसलेली स्वयंपाकगृहे, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ व प्रमाणपत्रांविना चालविल्या जाणाऱ्या आस्थापनांची आम्ही ओळख पटवून त्यांना तातडीने बंद करण्याचे आदेश जारी करत आहोत.

Vishwajit Rane
Mapusa FDA Raid: नागरीकांच्या जीवाशी खेळ, कृत्रिम पद्धतीने केळी पिकवणाऱ्याला रंगेहाथ पकडलं, 'एफडीए'कडून 1 टन साठा नष्ट

एफडीए संचालक श्वेता देसाई यांनी सांगितले की, आम्ही परवाने देणे, परवाने तपासणे, अनुपालन प्रमाणपत्रे प्रदान करणे यांसारखी नियमित कामे करतोच, पण त्याबरोबरच छापे टाकून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही सातत्याने करीत आहोत. नागरिकांकडून तक्रारी मिळाल्यास आम्ही तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करतो. तसेच तक्रारीशिवायही आमच्या तपासण्या आणि छापेमारीची मोहीम सुरू असते.

Vishwajit Rane
FDA Raid Mapusa: म्हापशात 'एफडीए'ची अन्नप्रक्रिया युनिट्‌सवर कारवाई; एकास 10 हजार रूपयांचा दंड

२०० हून अधिक छापे!

अन्न व औषध प्रशासन (एफडीए)च्या संचालक श्वेता देसाई यांनी सांगितले की, मी ऑगस्ट २०२४ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर आजपर्यंत विभागाने २०० हून अधिक छापे टाकले आहेत. गोमंतकीयांना सुरक्षित अन्न मिळावे हा आमचा मुख्य हेतू आहे आणि यासाठी आम्ही विशेष मोहीम राबवत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com