Mapusa Raid: म्हापशात मध्यरात्री थरार! ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा घाला, 24 वर्षीय विजय सिंगला रंगेहाथ पकडलं; दोन अल्पवयीन मुलही ताब्यात

Mapusa Drug Raid Bodgeshwar Temple: म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिरासमोरील मोकळ्या मैदानात अंमली पदार्थ विरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात एका संशयिताला अटक केली.
Mapusa Drug Raid Bodgeshwar Temple
Mapusa RaidDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिरासमोरील मोकळ्या मैदानात अंमली पदार्थ विरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात एका संशयिताला अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत गांजा आणि मेथेम्फेटामाइन (एमडी) असा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे उपनिरीक्षक दीनदयाळ रेडकर आणि त्यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे ही कारवाई केली. या छाप्यात विजय सिंग (वय २४) याला रंगेहाथ पकडण्यात आले.

संशयिताकडून सुमारे ५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याच कारवाई दरम्यान, एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाकडे ५ ग्रॅम मेथेम्फेटामाइन सापडले असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे २५हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक केलेल्या विजय सिंगची कसून चौकशी केली असता, या ड्रग्स नेटवर्कमध्ये अन्य दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे समोर आले. हे दोघेही ड्रग्सची व्यवस्था करण्यात मदत करत होते. पोलिसांनी तात्काळ हालचाली करून कारासवाडा येथून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले, तर दुसरा संशयित सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Mapusa Drug Raid Bodgeshwar Temple
Goa Crime: डिचोलीतील 'सेतू संगम'च्या सुरक्षेत त्रुटी, संशयास्पद मृतदेह सापडल्याने खळबळ

याप्रकरणी ‘एएनसी’ पोलिस स्थानकात एनडीपीएस कायद्याच्या कलम २०(ब)(२)(अ), २२(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयित विजय सिंगला म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, न्यायालयाने (Court) त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ताब्यात घेतलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर करून त्यांची रवानगी मेरशीत ‘अपना घर’मध्ये केली आहे. ही कारवाई ‘एएनसी’च्या एसपी सुनीता सावंत यांच्या मार्गदर्शनात व पोलिस अधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क व पोलिस निरीक्षक सगुण सावंत यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Drug Case
Goa Crime
Fake ED Officer Arrested
Goa cocaine supply
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com