भाजपला बसली चपराक, म्हापसा कोमुनिदाद अध्यक्षपदी पिंटो

आमदार ज्योशुआ डिसोझा यांच्यासह भाजपला धक्का
Joshua Dsouza
Joshua DsouzaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : म्हापसा कोमुनिदाद अध्यक्षपदी साल्वादोर पिंटो, मुखत्यारपदी डॉ. शिवानंद गावस, तर खजिनदारपदी एस्टेव्हम कुतिन्हो यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी पुरस्कृत केलेल्या उमेदवाराचा पराभव झाल्याने त्‍यांना व भाजपलाही चपराक बसलेली आहे.

या कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी लुसिंडो डोमिंगोस, उपमुखत्यारपदी राहुल फारिया, तर उपखजिनदारपदी जॅसिंटो पिंटो यांची निवड झाली आहे. मुखत्यार व खजिनदार वगळता सर्व पदांवर बिनविरोध निवड झाली. स्थानिक आमदार ज्योशुआ डिसोझा यांचे समर्थक असलेले मायकल कारास्को आणि डॉ. शिवानंद गावस यांच्यात मुखत्यारपदासाठी निवडणूक झाली. त्यात कारास्को यांना 102 मते मिळाली व डॉ. शिवानंद गावस यांना 128 मते मिळाली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी गावस यांना नवीन मुखत्यार म्हणून घोषित केले.

Joshua Dsouza
कारापूर-तिस्‍क, न्‍हावेली, पिळगावात उद्या वीज पुरवठा खंडित

त्याचप्रमाणे खजिनदारपदासाठी एस्टेव्हम कुतिन्हो आणि व्हिक्टोनिया डिमेलो यांच्यात लढत झाली असता कुतिन्हो यांना 147 मते, तर डिमेलो यांना केवळ 81 मते मिळाली. कोमुनिदाद सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत डॉ. शिवानंद गावस आणि साल्वादोर पिंटो यांच्या समर्थक पॅनेलने म्हापसा कोमुनिदाद निवडणुकीत मायकल कारास्को यांच्या समर्थक पॅनेलविरुद्ध विजय मिळवला आहे. निवडणुकीनंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष पिंटो म्हणाले, की आमच्या पॅनेलच्या बळावर निवडून आलेले समविचारी लोक होते. आता गावकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही कोमुनिदादची पारदर्शक कामकाजाची हमी देतो, जे आमच्या सदस्यांसाठी तसेच म्हापसा आणि गोव्याच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल, असेही पिंटो म्हणाले.

कोमुनिदाद निवडणुकीसाठी एकही तरुण पुढे येत नाही, ही मुख्य समस्या आहे. वर्षांनुवर्षे पारंपरिकरीत्या ज्येष्ठ मंडळीच हा कार्यभार चालवतात आणि हीच मंडळी हे कार्य पुढे नेतात. आमचा उद्देश कोमुनिदादचे कार्य करण्यासाठी तरुण असलेल्या दुसर्‍या पिढीची नवीन शक्ती तयार करणे आहे. - डॉ. शिवानंद गावस, मुखत्यार, म्हापसा कोमुनिदाद

युवकांनी कोमुनिदादच्या कारभारात सहभाग घेण्यासाठी पुढे यावे. युवावर्गाकडून आमच्या भरपूर आशा-अपेक्षा आहेत. त्यांनी कोमुनिदादच्या कामकाजात सक्रिय सहभाग घ्यावा व त्यांनी ते कामकाज शिकावे यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची आमची इच्छा आहे. - साल्वादोर पिंटो, अध्यक्ष, म्हापसा कोमुनिदाद

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com