Mapusa: नगराध्यक्षांच्या प्रभागातच रस्त्यांची दुर्दशा! गटारावरील लाद्या उखडल्या; म्हापशात वाहने चालवणे ठरतेय जोखमीचे

Mapusa Road: नगराध्यक्षांच्या प्रभागातील गटाराची कामे गेल्या तीन महिन्यांपासून साफ करून नव्याने बांधकाम करण्याचे काम सुरू होते. परंतु ते काही दिवसापासून खंडित ठेवण्यात आलेले आहे.
Mapusa Road
Mapusa RoadDainik Gomantak
Published on
Updated on

बार्देश: म्हापसा नगरपालिका सध्या अनेक विकासकामांपासून वंचित आहे. त्यात म्हापसा नगरपालिकेच्या दुसऱ्यांदा नगराध्यक्षा प्रिया मिशाळ झाल्या. परंतु त्यांच्या प्रभाग १० मधील रस्त्यांची पूर्णतः दुर्दशा होऊन रस्ते खड्डेमय झालेले आहेत.

तर गटारावरील लाद्या गटारात आणि गटाराच्या वर एकावर एक ठेवलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालवणे जोखमीचे झालेले आहे.

नगराध्यक्षांच्या प्रभागातील गटाराची कामे गेल्या तीन महिन्यांपासून साफ करून नव्याने बांधकाम करण्याचे काम सुरू होते. परंतु ते काही दिवसापासून खंडित ठेवण्यात आलेले आहे.

त्यामुळे गटाराचे काम बंद असल्याने त्यावरील काढलेल्या लाद्या तशाच गटारावरच ठेवण्यात आलेल्या आहेत, तर काही लाद्या पुन्हा गटारात पडलेल्या आहेत. त्यामुळे त्या भागात विद्रुप स्वरूप प्राप्त झालेले आहे.

Mapusa Road
Mapusa: म्हापशात अज्ञाताने जाळल्या 6 कचराकुंड्या; पालिकेची पोलिसांत तक्रार

पालिकेचे कामगार काम करतात परंतु त्याच्याकडे काम करून घेण्यासाठी सुपरवायझरचे म्हणावे तसे लक्ष नसते. परिणामी कामगार अर्धवट काम करतात व निघून जातात. त्यामुळे करण्यात आलेले काम अर्धवटच राहते आणि रस्त्याची व गटारांची विल्हेवाट लागते, असे प्रभाग १०मधील रहिवाशांनी सांगितले.

Mapusa Road
Mapusa Market: 'माशांची किरकोळ विक्री बंद करा'! म्हापसा मार्केट मासळी विक्रेता संघटनेचा इशारा

गेल्या महिन्यात नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले होते की, आपल्या प्रभाग १० मध्ये गटाराची कामे जोरात सुरू आहेत ती लवकरच संपतील. पण आता पाऊस जोरदार सुरू असून आणि गटारांची कामे अर्धवट ठेवलेली असूनही नगराध्यक्षा गप्प असल्याने या प्रभागात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com