Goa Drugs Case: अमली पदार्थाच्या वजनात तफावत, समीर केरकर दोषमुक्त; म्हापसा कोर्टाचा निकाल

Mapusa Additional Sessions Court: पोलिसांनी ड्रग्ज तपासणी किट्सच्या साहाय्याने चाचणी केली असता हा पदार्थ चरस असल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी त्याला अटक केली होती.
Goa Drugs Case: पोलिसाांच्या तपासकामातील तफावतीमुळे ड्रग्ज प्रकरणी केरकर निर्दोष; म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अमली पदार्थ विरोधी पोलिसांनी केलेल्या कारवाईवेळी तसेच फोरेन्सिक लॅबोटरीमध्ये केलेल्या तपासणीनंतर सादर करण्यात आलेल्या चरसच्या वजनात तफावती आढळून आल्याने म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयाचा फायदा देत संशयित समीर केरकर याला निर्दोष ठरवले.

अमली पदार्थ विरोधी पोलिस पथकाने मांद्रे - पेडणे येथील आस्कावाडा जंक्शनजवळ असलेल्या संतोष स्टोअरजवळ समीर केरकरची झडती घेतली असता त्याच्याकडील पिशवीत नऊ काळ्या रंगाचे तुकडे सापडले होते. पोलिसांनी ड्रग्ज तपासणी किट्सच्या साहाय्याने चाचणी केली असता हा पदार्थ चरस असल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी त्याला अटक केली होती. ही कारवाई १५ फेब्रुवारी २०११ रोजी केली होती. जप्त केलेला चरस एक किलोपेक्षा कमी असल्याने आरोपपत्र सादर झाल्यानंतर संशयित समीर केरकर याला सशर्त जामीन मिळाला होता.

Goa Drugs Case: पोलिसाांच्या तपासकामातील तफावतीमुळे ड्रग्ज प्रकरणी केरकर निर्दोष; म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय
Goa Drugs Case: खळबळजनक! गोव्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत अंमली पदार्थ पुरवले जात असल्याचा दावा

पोलिसांनी संशयित समीर केरकर याच्याकडून ८९० ग्रॅम चरस जप्त केला होता. मात्र, आरोपपत्रावरील सुनावणीवेळी साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीत नऊ तुकडे चरसचे सापडले होते त्यावर असलेल्या आवरणासह त्याचे वजन ९१५ ग्रॅम होते, असे सांगितले होते. चरसची तपासणी करताना प्रत्येक तुकड्यामधील १ ग्रॅम चरस घेण्यात आला होता. त्यामुळे एकूण वजनामध्ये तफावत आढळल्याने पोलिसांच्या या कारवाईबाबत संशयाला जागा राहते, असे निरीक्षण न्यायालयाने केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com