Vasco De Gama: रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी; वास्को स्थानकावरील तब्बल 18 ट्रेन रद्द

वास्को रेल्वे स्थानकावरील रूळाच्या महत्वाच्या कामानिमित्त हा बदल करण्यात आला आहे.
Vasco De Gama
Vasco De GamaDainik Gomantak
Published on
Updated on

Vasco De Gama Railway Station: वास्को रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या तसेच, स्थानकावर येणाऱ्या अनेक रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 12 ते 24 डिसेंबर या कालावधीत एकूण आठ ट्रेनच्या फेऱ्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. तर, दहा विविध ट्रेन अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. वास्को रेल्वे स्थानकावरील रूळाच्या महत्वाच्या कामानिमित्त हा बदल करण्यात आला आहे. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Vasco De Gama
Viral Video: 50 लोकांनी घरात घुसून केले डॉक्टर महिलेचे अपहरण; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

वास्को-द-गामा - वालंकिणी विकली एक्सप्रेस (Vasco Da Gama- Velankanni Weekly Express) 12 व 19 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. तसेच, वालंकिणी - वास्को-द-गामा विकली एक्सप्रेस 13 व 20 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. वास्को-द-गामा वरून जाणारी वास्को-द-गामा - कुले डेली एक्सप्रेस (Vasco Da Gama- Kulem Daily Express) 15, 23 आणि 24 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. तसेच, विशेष डेमू ट्रेन (DEMU train) 15, 23 आणि 24 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. वास्को-द-गामा ते आजरा (Vasco Da Gama- Kulem) ही पार्सेल कार्गो ट्रेन 16 आणि 21 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

Vasco De Gama
Cyclone Mandous Pictures: गाड्या तुटल्या, भिंती पडल्या, घरात शिरले पाणी; पाहा मंदोसची भीषणता

याशिवाय वास्को स्थानवरील दहा विविध ट्रेन अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये यशवंतपूर एक्सप्रेस ट्रेन वास्को ऐवजी मडगाव रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. शालिमार अमरावती ट्रेन, तिरूपती, हैद्राबाद, पटना ट्रेन अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी वास्को रेल्वे स्थानकावरून किंवा रद्द करण्यात आलेल्या ट्रेनचा प्रवास करण्यापूर्वी झालेला बदल लक्षात घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com