Goa: वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आणले कंत्राटी कर्मचारी

Manpower was brought in on contract basis to streamline the power supply
Manpower was brought in on contract basis to streamline the power supply
Published on: 
Updated on: 

पणजी: 'तौक्ते' चक्रीवादळाने गोव्याच्या किनारपट्टीवर धडक दिल्यानंतर गोव्यात प्रचंड नुकसान झाल्याचे आहे. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणि झाडे उन्मळून पडली, घरांचे नुकसान झाले आहे. तसेच विजेचे खांब आणि तारा तुटून पडल्याने जवळपास 3 दिवस गोव्यातील बहुतांश भाग अंधारात होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सध्या काम सुरु आहे. यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ आणावे लागले असल्याचे समजते आहे. (Manpower was brought in on contract basis to streamline the power supply)

आमदार ज्योशुवा डिसौजा यांनी सांगितले, मुख्य वीज आभियंता, कार्यकारी आभियंता, सहाय्यक अभियंता व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रात्रंदिवस पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करीत आहेत. 45 घरावर झाडे पडली आहेत. वीजवाहिन्या तूटुन पडल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यास वेळ लागत आहे. पेड आकय, मरड, आगड-खोर्ली, अन्साभाट भागामध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्याशाठी मनुष्यबळ कंत्राठी पद्धतीने आणले आहे, अशी माहिती आमदार डिसौजा यांनी सांगितले.

निधीअभावी भूमिगत वाहिन्यांचे काम रखडले

वीज खात्याचे मुख्य वीज अभियंता रघुवीर केणी यांनी माहिती देताना सांगितले की, म्हापसा येथील काही भागात भूमिगत वाहिन्या घालण्यासंदर्भाची निविदा तयार करून सरकारच्या संमतीसाठी पाठवण्यात आली.  33  केव्ही व 11 केव्ही फिडरच्या भूमिगत वाहिन्यांची गरज आहे. या भूमिगत वाहिन्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार आहे. निधी हा मुख्य अडथळा असल्याने हे काम काहीसे रखडले आहे. त्यामुळे हे भूमिगत वाहिन्यांचे काम निधीनुसार  टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येईल. ज्या ठिकाणी लोकांची वस्ती दाट आहे तेथे हे काम अगोदर केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant supports Jit Arolkar in Mandrem
Goa Assembly elections 23 constituencies
Canacona Silent Protest
 Yuri Alemao Girish Chodankar