Mankurad Mango: पणजीच्या बाजारात मानकुरादचा घमघमाट! दरात मोठी घट, येत्या आठवड्यात दर आणखी कोसळणार?

Goa Mankurad Mango: उन्हाळ्याची चाहूल लागताच गोमंतकीयांना वेध लागतात ते लाडक्या मानकुराद आंब्याचे. मागील दोन आठवड्यांपासून कडाडलेल्या आंब्याच्या दरांनी आता उतरण घेतली.
Mankurad Mango
Mankurad MangoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: उन्हाळ्याची चाहूल लागताच गोमंतकीयांना वेध लागतात ते लाडक्या मानकुराद आंब्याचे. मागील दोन आठवड्यांपासून कडाडलेल्या आंब्याच्या दरांनी आता उतरण घेतली असून, पणजीच्या बाजारपेठेत मानकुरादचा दरवळ सामान्यांच्या आवाक्यात येत आहे. मध्यम आकाराचे मानकुराद आंबे आता १२०० रुपये डझन दराने विक्रीसाठी उपलब्ध आहेत, म्हणजेच एका आंब्यासाठी ग्राहकांना आता १०० रुपये मोजावे लागत आहेत.

पुढील आठवड्यात दर ८०० रुपयांपर्यंत येण्याची शक्यता

सध्या जरी दर १२०० रुपये डझन असले, तरी आवक वाढल्यामुळे येत्या आठवड्याभरात हे दर ७०० ते ८०० रुपये डझनपर्यंत खाली येतील, अशी शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे मानकुराद प्रेमींना मोठा दिलासा मिळणार आहे. मानकुरादसोबतच बाजारात 'हापूस' आंब्याचीही एन्ट्री झाली असून तो ८०० रुपये डझनने विकला जात आहे. याशिवाय केसरी आणि मांगेलाल यांसारख्या आंब्यांचे दर ६०० ते ७०० रुपये डझनच्या आसपास आहेत.

Mankurad Mango
Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

बाजारात रानमेव्याचीही रेलचेल

आंब्यांसोबतच पणजीच्या बाजारात उन्हाळी रानमेवा देखील दाखल झाला आहे. फणसाचे रसाळ गरे, जांभळे आणि इतर रानमेवा ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. चैत्र महिन्यातील या फळांच्या राजाच्या स्वादाचा आनंद घेण्यासाठी गोवेकरांची पावले आता बाजारपेठेकडे वळू लागली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com