Mangrove Unit: केपे सरकारी कला, विज्ञान महाविद्यालयात खारफुटी केंद्राची स्थापना, तज्ज्ञांकडून होणार मार्गदर्शन

Mangrove Conservation Unit Quepem: उपप्राचार्य प्रा. मेहताब बुखारी यांनी महाविद्यालयाने केलेल्या खारफुटीसंदर्भातील विविध उपक्रमांचा अहवाल सादर केला.
 Mangrove awareness
Mangrove conservationDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: खारफुटीचे संवर्धन आणि त्या संदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतीय खारफुटी सोसायटी (मँग्रोव्ह सोसायटी ऑफ इंडिया)च्या सहकार्याने कला, विज्ञान आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालय केपे येथे खारफुटी युनिटची स्थापना करण्यात आली.

यावेळी भारतीय खारफुटी सोसायटीचे कार्यकारी सचिव डॉ. विनोद धारगळकर, एनआयओच्या माजी शास्त्रज्ञ आणि भारतीय खारफुटी सोसायटीच्या कोषाध्यक्ष डॉ. सईदा वफर, भारतीय खारफुटी सोसायटीचे सहसचिव कवळेकर आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रविणा केरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नाट्यसादरीकरणाने झाली. ज्यामध्ये खारफुटीच्या ऱ्हासाचा वाढता धोका आणि त्याचा परिसंस्थेच्या जैवविविधतेवर होणारा नकारात्मक परिणाम दाखविण्यात आला.

 Mangrove awareness
Khazan Land: शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब! खाजन जमिनींच्या आम्लतेत होतेय वाढ; भातशेती, इतर उत्पादने धोक्यात येण्याची शक्यता

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रवीणा केरकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी भारतीय खारफुटी सोसायटीचे कार्यकारी सचिव डॉ. विनोद धारगळकर यांच्याहस्ते खारुटी युनिटसाठी प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह महाविद्यालयाच्या प्राचार्यां डॉ. प्रवीणा केरकर यांना प्रदान करण्यात आले. डॉ. शिल्पा हिंदळेकर आणि डॉ.सुजाता दाभोळकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. उपप्राचार्य प्रा. मेहताब बुखारी यांनी महाविद्यालयाने केलेल्या खारफुटीसंदर्भातील विविध उपक्रमांचा अहवाल सादर केला. वनस्पतीशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ.अ‍ॅनी गोम्स यांनी आभार मानले.

 Mangrove awareness
Goa Mangroves: गोव्याचे नैसर्गिक वैभव! हवेतून कार्बन-डाय-ऑक्साइडचे शोषण करण्याच्या बाबतीत खारफुटी 'चॅम्पियन'

किनारपट्टीची धूप थांबते : धारगळकर

भारतीय खारफुटी सोसायटीचे कार्यकारी सचिव डॉ. विनोद धारगळकर यांनी आपल्या सादरीकरणातून खारफुटीच्या परिसंस्थेचा आढावा घेतला. जैवविविधता राखण्यात आणि किनारपट्टीची धूप रोखण्यात खारफुटीची भूमिका महत्त्वाची असते असे डॉ. धारगळकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com