Goa Mining : कावरे कृषी क्षेत्रात मँगनीज खाणीचा घाट

स्थानिकांचा तीव्र विरोध : 11 एप्रिल रोजी जनसुनावणी
Kaware agricultural area
Kaware agricultural areaDainik Gomantak
Published on
Updated on

केपे तालुक्यातील कावरे या आदिवासीबहुल गावात 70 टक्के लोकांची उपजीविका ज्या डोंगरावर अवलंबून आहे, त्या ‘जांबळीदादगो’ डोंगरावर मॅंगनीज खाण सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. ही खाण सुरू झाल्यास स्थानिक आदिवासींचा उत्पन्नाचा स्रोत नाहीसा होईल अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

Kaware agricultural area
Ratnagiri Madgaon: रत्नागिरी - मडगाव डेली एक्सप्रेस रद्द, 'या' तारखेपर्यंत सेवा राहणार बंद

या डोंगरावर स्थानिक आदिवासी लोक कुमेरी शेती करतात. तेथे लोकांच्या मोठ्या प्रमाणावर काजू बागायतीही आहेत. अशा परिसरात 70.20 हेक्टर जागेत ही खाण सुरू होत आहे. त्यासंबंधी लोकांच्या काही हरकती असल्यास 11 एप्रिल रोजी पर्यावरण विषयक जनसुनावणी घेण्याचे ठरले आहे.

मायणा सरकारी विद्यालयाच्या मैदानावर ही जनसुनावणी सकाळी 10 वाजता होणार आहे. सदर जागेत मँगनीज खाण सुरू करण्यास आमचा विरोध आहे आणि तो यापूर्वीच व्‍यक्त केला होता.

Kaware agricultural area
Video: गोव्यात लागलेल्या आग नियंत्रणासाठी तब्बल 25000 लिटरपेक्षा जास्त पाण्याचा वापर; मात्र तरीही...

पण तो लक्षात न घेता सरकार हा प्रस्ताव पुढे नेऊ पाहत आहे. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही, असे पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते रवींद्र वेळीप यांनी सांगितले.

या जागेत स्थानिक आदिवासी पूर्वपरंपरेने कुमेरी शेती करत आहेत. अशा 170 आदिवासी लोकांनी वनाधिकार कायद्याखाली या जमिनीवर आपला दावा सांगितला आहे.

मात्र हे दावे अजूनही निकालात काढलेले नाहीत. या डोंगरावर खाण सुरू केल्यास या लोकांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती वेळीप यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com