Mangaluru Madgaon Vande Bharat Express
Mangaluru Madgaon Vande Bharat ExpressDainik Gomantak

Mangaluru Madgaon Vande Bharat Express: मंगळुरू-मडगाव मार्गावर धावली वंदे भारत, पर्यटनास होणार लाभ

सर्वांनी जल्लोषात या रेल्वेचे स्वागत केले.
Published on

Mangaluru - Madgaon Vande Bharat Express: मडगाव ते मंगळुरू या मार्गावर चालू झालेली 'वंदे भारत' ही ट्रेन गोवा तसेच मंगळुरू या दोन्ही प्रदेशांच्या पर्यटनवृद्धीचे महाद्वार ठरेल, असे मत दक्षिण मंगळुरू शहर मतदारसंघाचे आमदार वेदव्यास कामथ यांनी व्यक्त केले.

शनिवारी (ता. 30) मंगळुरू सेंट्रल या स्टेशनवरून दुपारी 12.15 वाजता या रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखविला. सर्वांनी जल्लोषात या रेल्वेचे स्वागत केले.

यावेळी मंगळुरू - गोवा या मार्गावर ही रेल्वे सुरू व्हावी, यासाठी मोलाची भूमिका बजावणारे मंगळुरूचे खासदार नलीन कुमार कटील हेही उपस्थित होते.

लवकरच मंगळुरू- कोची वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार, अशी घोषणा त्यांनी केली. अन्य दोन ठिकाणांशी मंगळुरूहून 'वंदे भारत' जोडली जाणार, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com