Hotel Mandovi Riviera: गोव्यातील हॉटेल मांडवी रिव्‍हेरा केलं 'सील'

Hotel Mandovi Riviera: भाडे थकल्‍याने पर्यटन खात्‍याने जागा ताब्‍यात घेतली
Hotel Mandovi Riviera
Hotel Mandovi Riviera Dainik Gomantak
Published on
Updated on

Hotel Mandovi Riviera: जागेचे भाडे न दिल्‍याच्‍या कारणावरून पर्यटन खात्‍याने येथील हॉटेल मांडवी रिव्‍हेरा आज शुक्रवारी सील केले. यावेळी पर्यटन खात्‍याचे उपसंचालक धीरज वागळे, साहाय्यक संचालक गजानन महाले आणि कनिष्ठ अभियंता साहिल धुरी आणि खात्‍याचे कर्मचारी उपस्‍थित होते.

धीरज वागळे म्हणाले की, पणजी पार्क नावाने परिचित असलेली मांडवी किनाऱ्यावरील जागा २० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिली होती. संबंधित हॉटेलचालकांनी भाड्याची सुमारे १७ लाख रुपयांची थकबाकी अद्याप भरलेली नाही. याबाबत खात्‍याने अनेक नोटीस पाठवल्‍या पण संबंधितांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे गेल्‍या नोव्‍हेंबरमध्ये पर्यटन खात्‍याने नोटीस पाठवली. पण त्‍यांनी या नोटीशीला आव्‍हान दिले आणि हे पर्यटन खात्‍याला हे अधिकार नसल्‍याचे सांगितले.

Hotel Mandovi Riviera
Munawar Faruquiचा शो दिल्लीत होणार नाही, VHPच्या धमकीनंतर दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय

यामुळे हे प्रकरण उपजिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्‍याचे वागळे यांनी सांगितले. कॅसिनो (Casino) कडून दंड वसूल करणार हॉटेल मांडवी रिव्‍हेराच्‍या संचालकांनी त्‍यांच्‍या ताब्‍यात असलेल्‍या जागेपैकी काही जागा येथील कॅसिनोला पार्किंगसाठी दिली होती. या पार्श्वभूमीवर त्‍यांच्‍याकडून दंड वसूल करण्यात येईल तसेच संबंधित कॅसिनोला ही जागा तातडीने रिकामी करण्यास सांगितले असून त्‍यांनी ही जागा शुक्रवारी संध्याकाळपर्यंत रिकामी करण्याचे आश्‍वासन दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com