Mandrem Police Station : मांद्रे पोलिस स्थानकामध्ये कार्यालयीन वाहनांची कमतरता

Shortage of office vehicles : घटनास्थळी पोहोचण्यास पोलिसांना अडचणी : मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी
Shortage of office vehicles
Shortage of office vehiclesDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी, मोठा गाजावाजा करत मांद्रे मतदारसंघासाठी खास जुनस वाडा-मांद्रे या ठिकाणी पोलिस स्थानकाची निर्मिती केली. परंतु या पोलिस स्थानकामध्ये वाहनांचा अभाव असल्यामुळे घटनास्थळी पोलिस वेळेवर पोहोचत नाहीत.

पोलिसांसाठी त्या ठिकाणी कसल्याच प्रकारच्या सोयीसुविधा नाहीत. याकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

यांनी लक्ष देऊन पोलिसांना अतिरिक्त वाहनांची सोय करावी, अशी मागणी केली जात आहे.

मांद्रे मतदारसंघासाठी खास स्वतंत्र पोलिस स्थानकाची निर्मिती व्हावी, यासाठी स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी सरकार दरबारी प्रयत्न केले आणि सरकारने या पोलिस स्थानकाच्या निर्मितीसाठी मंजुरी दिली.

जरी पोलिस स्थानकासाठी स्वतंत्र इमारत उभारली गेली नसली, तरी आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध असलेल्या इमारतीमध्ये पोलिस स्थानक कार्यरत झाले आहे. परंतु या पोलिस स्थानकामधून मांद्रे मतदारसंघातील गावांत जाण्यासाठी पोलिसांकडे वाहने नसल्याने कधीतरी पोलिसांना स्वतःचीच वाहने घेऊन घटनास्थळी जावे लागते.

याकडे गृह खात्याने लक्ष देऊन वाहने पुरवावीत, अशी मागणी मोरजीचे सरपंच मुकेश गडेकर यांनी केली आहे.

Shortage of office vehicles
Goa Assembly Monsoon Session: लक्षवेधीवरुन विरोधक सभापतींच्या हौदात, दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामकाज तहकूब

नागरिकांच्या तक्रारींत वाढ

या ठिकाणी पोलिस स्थानकातील कर्मचाऱ्यांना कॅन्टिनची सोय आवश्यक आहे. तसेच येथे पोलिसांची संख्या कमी असल्याने आणि त्यांना घटनास्थळी वेळीच जाता येत नसल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत.

पोलिस स्थानकामध्ये वाहने उपलब्ध नसल्याने कधी कधी पोलिसांना स्वतःची वाहने घेऊन इतरत्र धावपळ करावी लागते. याकडे सरकारने लक्ष देऊन येथे जास्तीत जास्त वाहनांची सोय करून समस्या सोडवाव्यात, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com