Jogging Park : जुनसवाडा-मांद्रे येथे लवकरच जॉगिंग पार्क : जीत आरोलकर

jogging park : यावेळी मांद्रे उपसरपंच तारा हडफडकर, पंच रॉबर्ट फर्नांडिस, पंच चेतना पेडणेकर, पंच राजेश मांजरेकर, पंच सौ फर्नांडिस, रोबोट फर्नांडिस पंच सौ आजगावकर आदी उपस्थित होते.
Jogging Park
Jogging ParkDainik Gomantak
Published on
Updated on

Jogging Park : मोरजी, मांद्रे पंचायत क्षेत्रातील जुनासवाडा या ठिकाणी सरकारी जागेत बहुउद्देशीय असा जॉगिंग पार्क लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना सोयी सुविधायुक्त असा प्रकल्प उभारला जाणार आहे, अशी माहिती मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली.

सरकारी जागेत जॉगिंग पार्क प्रकल्प उभारण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत जमिनीची पाहणी केल्यानंतर ते स्थानिक पत्रकारांशी बोलत होते.

आमदार आरोलकर पुढे म्हणाले की, उत्तर आणि दक्षिण अशा दोन जिल्ह्यांमध्ये असे पार्क उभे राहणार आहेत. दक्षिण गोव्यात वास्कोत, असा पार्क उभा राहिलेला आहे. त्याच धर्तीवर उत्तर गोव्यात एक बहुउद्देशीय असा जॉगिंग पार्क मांद्रे जुनसवाडा येथील जमिनीत उभारण्यात येणार आहे. त्याशिवाय विविध सोयी सुविधांसह पार्किंग व्यवस्थाही केली जाईल.

यावेळी मांद्रे उपसरपंच तारा हडफडकर, पंच रॉबर्ट फर्नांडिस, पंच चेतना पेडणेकर, पंच राजेश मांजरेकर, पंच सौ फर्नांडिस, रोबोट फर्नांडिस पंच सौ आजगावकर आदी उपस्थित होते.

Jogging Park
Honda Industrial Estate : होंडा औद्योगिक वसाहतीतील गटार व्यवस्थेचे तीनतेरा; सुविधांचा अभाव

फॉरेस्ट पार्क जागेत ‘जॉगिंग’ अशक्य!’

नियोजित जॉगिंग पार्क प्रकल्पाच्या समोर वनखात्यांतर्गत विस्तारित असे फॉरेस्ट पार्क उभारले आहे.

त्या फॉरेस्ट पार्क मध्ये विस्तारित जॉगिंग पार्क करता येणार नाही का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आमदार आरोलकर यांनी सांगितले की फॉरेस्ट विभाग केवळ झाडे लावण्यासाठी परवानगी देतो. त्या जागेत इतर बांधकामे किंवा इतर प्रकल्प आणण्यास सहजासहजी ‘ना हरकत दाखला’ मिळत नसल्याचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com