Mandrem News : मांद्रेतील हनुमान देवस्थानतर्फे विद्यार्थी, मान्‍यवरांचा सत्‍कार

यावेळी मांद्रेचे आमदार तथा गोवा गृहनिर्माण मंडळाचे अध्‍यक्ष जीत आरोलकर यांची प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थिती होती.
Mandrem  Hanuman Temple Felicitates Students
Mandrem Hanuman Temple Felicitates StudentsDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल : मांद्रे येथील श्री हनुमान देवस्थानतर्फे गुणवंत विद्यार्थी व पदवी-पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा नुकताच उत्‍साहात पार पडला. यावेळी मांद्रेचे आमदार तथा गोवा गृहनिर्माण मंडळाचे अध्‍यक्ष जीत आरोलकर यांची प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थिती होती.

सत्‍कारमूर्ती विद्यार्थ्यांमध्‍ये ऋषिकेश नागवेकर, सानवी नागवेकर, सेजल कलशावकर, आदर्श गोसावी, कृष्णा विर्नोडकर, विजेश पटेकर, ऋषिकेश किनळेकर, नंदिश किनळेकर, शांभवी नाईक, वैभवी पालयेकर, डॉ. रश्मी पोखरे, सेजल पेडणेकर, दीपा पालयेकर, रश्मी पालयेकर यांचा समावेश होता. वाड्यावरील प्रथम डॉक्टर रश्मी यांचाही सन्‍मान करण्‍यात आला.

Mandrem  Hanuman Temple Felicitates Students
नवचेतना युवा संघातर्फे कलाकारांचा सत्कार | Nava Chetana Yuva Sangh Felicitates artists | Gomantak TV

तसेच देवस्थानतर्फे वाड्यावरील देवस्थानचे अध्यक्ष तथा सत्कारमूर्ती रंगनाथ कलशावकर, मुकुंद कायसुवकर, रामदास कलशावकर, रामचंद्र पालयेकर, घनश्याम सातार्डेकर, सूर्यकांत पोखरे, मनोहर पोखरे, रमेश पोखरे, नंदकिशोर किनळेकर, कृष्णा वराडकर, सागरिका पोखरे, वामन हरमलकर या सरकारी-निमसरकारी सेवेतून निवृत्त व्यक्तींचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन आमदार आरोलकर यांच्‍या हस्ते सत्कार करण्यात आला.

Mandrem  Hanuman Temple Felicitates Students
वाळपई येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार | Meritorious students felicitated at Valpoi | Gomantak Tv

यावेळी व्यासपीठावर जिल्‍हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, सरपंच ॲड. अमित सावंत, पंच मिंगेल फर्नांडिस आणि मान्‍यवरांची उपस्‍थिती होती. सेजल कलशावकर, उमाकांत पेडणेकर, प्रभाकर पेडणेकर यांनी पाहुण्‍यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उदेश पेडणेकर यांनी सूत्रसंचालन केले व त्‍यांनीच शेवटी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com