Goa Crime: खेळाडूंना मारहाण,धमकीप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह दोघांच्या कोठडीत वाढ

Goa Crime: २३ ऑगस्ट रोजी रात्री हा मारहाणीचा व गोळीबार करण्याचा प्रकार घडला होता
Goa Crime: २३ ऑगस्ट रोजी रात्री हा मारहाणीचा व गोळीबार करण्याचा प्रकार घडला होता
Crime|ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: दिल्लीतील खेळाडूंना मारहाण तसेच धमकी दिल्याप्रकरणी सराईत गुंड शैलेश गरड उर्फ गरगाटलो व सौरभ धावणे या दोघांना अतिरिक्त दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

२३ ऑगस्ट रोजी, रात्री ११.४५च्या सुमारास हा मारहाणीचा व गोळीबार करण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी विशाल शौकीन (२२, दिल्ली) हे फिर्यादी आहेत. विशाल हे कोच असून ते आपल्या दोन विद्यार्थ्यांसह गोव्यात आले होते. मांद्रे येथील एका शूटिंग अ‍ॅकाडमीस्थळी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेची पात्राता फेरीत सहभागी होण्यासाठी ते आले होते.

Goa Crime: २३ ऑगस्ट रोजी रात्री हा मारहाणीचा व गोळीबार करण्याचा प्रकार घडला होता
Goa Crime: पार्किंगच्या वादातून हवेत गोळीबार! नेमबाजी स्पर्धेतील प्रशिक्षकाचे कृत्य

घटनेच्या दिवशी, रात्री शौकीन हे आपल्या विद्यार्थ्यांसोबत करासवाडा, म्हापसा येथे रेंट-अ-कारने फास्ट-फूडस्थळी जेवण करण्यासाठी आले होते. तिथे संशयित शैलेश गरड, सौरभ व इतरांनी पार्किंगवरुन शौकीन यांच्यासोबत हुज्जत घातली.

त्यानंतर त्यांना मारहाण करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या फिर्यादीने आपल्याजवळील एअर पिस्तुलने हवेत कोरडी गोळीबार केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com