मानशी टिकविणे ही काळाची गरज

मानस ही खाजन शेतीचे रक्षण करते
Farm
Farm Dainik Gomantak

आपल्‍या गोव्यात प्रथम शेतीला सुरूवात झाली ती डोंगर परिसरातील कुमेरी शेतीला. तेथून नदीच्‍या काठाने मानव मैदानी भागात पोचून त्याने पाण्याचा साठा असलेल्‍या भागात वायगंणी शेती केली. नंतर तो नद्यांच्या मुखाकडे पोहोचला.

नद्यांच्या मुखाकडील मैदानी परिसर सुपीक असल्याने त्याने मैदानी भागात बांध उभारुन त्‍यावर (मानस) लाकडी दरवाजे उभारून तेथे खाजन शेती करुन गोवा अन्नधान्न्याचे कोठार बनविले. नद्यांच्या मुखाकडून वरच्या भागात प्रवास करून पहिल्यास आज हे दिसून येते.

सासष्टीतील कुडतरी, राय, लोटली, कुठ्ठाळी, सांकवाळ, तिसवाडीतील कुडका, शिरदोन, नेवरा, डोंगरी, आजोशी, करमळी, ओल्ड गोवा, रायबंदर, चिंबल, मेरशी, सांताक्रुझ, ताळगाव, चोडण, दिवार, वाशी, आखाडा, कुंभारजुवे, सांतिनेज,

बार्देशमधील बिठ्ठोण, एकोशी, पोंबुर्पा, तळावली, हळदोणा, खोर्जुवा, कालवी, पेडणेमधील चोपडे, तुये, कोरगाव, आराबो, डिचोलीतील शिरगाव, पैरा, मये, नार्वे, पिळगाव, सर्वण, विर्डी, आमोणा, कुडणे, न्‍हावेली, मायणी, कोठंबी,

फोंड्यातील खांडोळा, वरगाव, बेतकी, तिवरे, वळवई, भोम, अडकोण, कुंडई, मडकई, बांदोडा, आगापूर, बोरी, शिरोडा, पंचवाडी या गावांतील नद्यांच्‍या काठावरील खाजन शेतीला मानशीच्या रुपाने शेती टिकविण्याची जबाबदारी घेतलेली दिसून येते.

Farm
Sal River: नद्या वाचवूया; सुखी, समृद्ध होऊया

मानस ही खाजन शेतीचे रक्षण करते. गोडे पाणी आणि खाऱ्या पाण्याचा मिलाफ घडवून जैवविविधतेला जन्मास घालून तिचे रक्षण करते.

तिला वाढवून मानवास अन्न म्हणून भात, कडधान्ये, भाजीपाला आणि रुचकर मासळी देते. चोणकूल, शेवटा, तामसा, पालू, खरचाणी, शेतुक, झिंगे, वांगी, खेकडे असे कैक प्रकारचे रुचकर मासे शेतातील खळ्यात मोठ्या प्रमाणात मिळतात.

Farm
River: खांडेपार, म्‍हादई, दूधसागर नद्यांची कमी होतेय जलपातळी

मानशीमुळे जैवविविधतेची होते पैदास

मानस ही कृत्रिम असली तरी जैवविविधतेला जन्मास घालण्याचे आणि वाढविण्याचे काम करते. समुद्राच्‍या भरतीचे पाणी जोरात येते त्यावेळी तिचे दरवाजे बंद होतात आणि ओहोटीवेळी उघडतात.

अशाने खारे आणि गोड्या पाण्याचा मिलाफ घडवून त्यातून वेगवेगळ्या जैवविविधता जन्मास येते. कैक ठिकाणी मानशी तुटून खाजन शेती पडिक झालेली दिसते. काही शेतांत मोठ्या प्रमाणात पाणी भरून मत्‍स्‍यपैदास सुरू झालेली दिसते. शेतीव्यवसाय केला तरच जैवविविधता टिकेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com