गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

Google Maps accident Goa: गुगल मॅपच्या नादात रस्ता चुकल्याने खोर्जुवे-हळदोणा येथील वापरता नसलेल्या फेरीधक्क्यावरून जीप्सी कार थेट नदीत गेली.
Man drowns following Google Maps
Goa tragic accident newsDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गुगल मॅपच्या आधारे प्रवास करताना, रस्ताचा अंदाज न आल्याने जीप्सी कार फेरी धक्क्यावरून थेट नदीच्या पाण्यात बुडाली. सुदैवाने कारचालक वाचला. ही घटना रविवारी उत्तररात्री २ वा. घडली. ही कार सकाळी अग्निशमन दलाने, स्थानिकांच्या मदतीने नदीतून बाहेर काढली.

उपलब्ध माहितीनुसार, गुगल मॅप लावून धावणाऱ्या वाहनांचे अपघात अलीकडे सर्रास घडताहेत. अशीच घटना, खोर्जुवे-हळदोणे येथे रविवारी उत्तररात्री २ वा. घडली. कारचालक अमनदीप सिंग मुल्तानी (रा. मयडे, बार्देश व मूळ चंदीगढ) हे (जीए-०८- आर-२१५४) क्रमांकाच्या जीप्सीने मयडेच्या दिशेने चालले होते.

Man drowns following Google Maps
Goa tragic accident newsDainik Gomantak
Man drowns following Google Maps
Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

मात्र, गुगल मॅपच्या नादात रस्ता चुकल्याने खोर्जुवे-हळदोणा येथील वापरता नसलेल्या फेरीधक्क्यावरून जीप्सी कार थेट नदीत गेली. यावेळी जोरदार कोसळत होता.

सुदैवाने ही जुनी जीप्सी असल्याने तिला सॉफ्ट टॉप हुड (कापडी कव्हर) होते. जे कारचालकाने चेनच्या मदतीने उघडले. ज्याने कारचालकाला गाडीच्या मागील बाजूने बाहेर पडता आले व पोहत त्याने फेरीधक्का गाठला. नंतर मयडे येथील आपले घर गाठले.

Man drowns following Google Maps
Goa Politics: "एकटा लढेन, मागे फिरणार नाही",पक्ष तिकीट न मिळाल्यास 'स्वतंत्र' लढणार; डॉ. केतन भाटीकर यांची मोठी घोषणा
Man drowns following Google Maps
Goa tragic accident newsDainik Gomantak

या घटनेची माहिती सोमवारी (ता. २७) सकाळी १०.३० वा. म्हापसा पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर म्हापसा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने, नदीत बुडालेल्या जीप्सीचा शोध घेतला. नंतर दोरीच्या साहाय्याने जीप्सी पाण्याबाहेर काढली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com