Molem Accident: वीजवाहिनीच्‍या खड्ड्यात पडून दुचाकीस्‍वार ठार; मोले येथील दुर्घटना

Accidental Death In Goa: हा प्रकार समजताच ग्रामस्थ संतप्‍त बनले व त्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला
Accidental Death In Goa: हा प्रकार समजताच ग्रामस्थ संतप्‍त बनले व त्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला
AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

कुळे: भूमिगत वीजवाहिनी टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाला आपला जीव गमवावा लागण्‍याची घटना धारबांदोडा तालुक्यातील मोले येथे काल रविवारी रात्री उशिरा घडली. राजू भट (६०, रा. जांबोली-मोले) असे त्‍यांचे नाव आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, दुचाकीने जात असता राजू भट हे सरळ खड्ड्यात पडले. गंभीर अवस्‍थेत त्‍यांना उपचारांसाठी गोमेकॉत नेत असता वाटेतच त्‍यांची प्राणज्‍योत मालवली. हा प्रकार समजताच ग्रामस्थ संतप्‍त बनले व त्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

Accidental Death In Goa: हा प्रकार समजताच ग्रामस्थ संतप्‍त बनले व त्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला
Branch Of Tree Collapses: शिगाव-मोले रस्त्यावर झाडाची फांदी कोसळली

कंत्राटदाराला बोलावून घेतली नुकसान भरपाई

ग्रामस्थांनी भरपाई म्‍हणून १५ लाख रुपये भट यांच्‍या कुटुंबाला द्यावेत अशी मागणी केली. तेव्हा कंत्राटदार गप्पच राहिला. त्‍यामुळे ग्रामस्थ खवळले. तेव्हा ‘‘१० लाख आपण नुकसान भरपाई देतो. त्‍यातील रोख पाच लाख आज देतो व उर्वरित पाच लाख रुपये दोन दिवसांनी देतो’ असे कंत्राटदाराने सांगितले. त्‍यामुळे ग्रामस्थ शांत झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com