Man assaults Wife arrested in Pilerne
Man assaults Wife arrested in PilerneDainik Gomantak

Porvorim News: पिळर्ण येथे पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

शनिवारी रात्रीच्या वेळी ही घटना घडली, त्यानंतर रविवारी महिलेने याप्रकरणी पर्वरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Published on

Porvorim News: पिळर्ण येथे पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पतीला अटक करण्यात आलीय.

सिद्धार्थ नाईक (वय 46, रा. पिळर्ण) असे या अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी पतीचे नाव आहे.

(Man assaults Wife arrested in Pilerne)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ याने त्याच्या पत्नीला मारहाण केली. पत्नीला मारहाण करताना त्याच्या हातात कोयता देखील होता. या मारहाणीत महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे.

शनिवारी रात्रीच्या वेळी ही घटना घडली, त्यानंतर रविवारी महिलेने याप्रकरणी पर्वरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर रविवारी रात्री संशयित आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 324 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com