Land Grabbing Case: जमीन हडप प्रकरणात मामलेदार राहूल देसाईला SIT कडून अटक

राजपत्रित सरकारी अधिकाऱ्याला अटक होण्याची ही पहिलीच घटना
Goa Land Grabbing Case
Goa Land Grabbing CaseDainik Gomantak

गोव्यातील जमीन हडप प्रकणातील (Land Grabbing Case) मोठी घडामोड समोर आली आहे. जमीन हडप प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने (SIT) मामलेदार राहूल देसाई (Rahul Desai) याला अटक केली आहे. राजपत्रित सरकारी अधिकाऱ्याला अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे. जमीन हडप प्रकरणात मोठा मासा एसआयटीच्या गळाला लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जमीन हडप प्रकरणी राहूल देसाई वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. याप्रकरणात देसाई यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांनी बार्देश (Bardez) येथून मुरगाव (Mormugao) येथे बदली करण्यात आली. विशेष तपास पथकाने (SIT) जमीन हडप प्रकरणाच्या चौकशी प्रकरणी देसाई यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी नंतर देसाई यांना अटक केली आहे.

Goa Land Grabbing Case
Vasco News: यह पब्लिक है, सब जानती है! वास्कोत रेशनच्या तांदुळाचा काळाबाजार

दरम्यान, सध्या एसआयटीकडे जमीन हडपप्रकरणाच्‍या तक्रारी येत असून त्यांची संख्या सुमारे 200 वर गेली आहे. प्रत्येक प्रकरणाची माहिती मिळवण्यास विलंब होत आहे. त्याची ठोस माहिती महसूल खात्याकडून मागण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com