Pernem Retaining Wall Collapsed: मालपेत दरड हटविण्याचे काम सुरू; वाहतूक एकेरी

Pernem Retaining Wall Collapsed: उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दरड पडलेल्या ठिकाणची वाहतूक एकेरी रस्त्यावरून वळवली आहे.
Pernem Retaining Wall Collapsed
Pernem Retaining Wall CollapsedDainik Gomantak

Pernem Retaining Wall Collapsed

मालपे येथे राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळलेल्या ठिकाणी आज सकाळपासून दोन मोठ्या जेसीबी यंत्रांद्वारे कोसळलेली माती हटविण्याचे काम सुरू झाले आहे.

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दरड पडलेल्या ठिकाणची वाहतूक एकेरी रस्त्यावरून वळवली आहे. जेसीबी यंत्रे मोठी असली तरी कोसळलेल्या दरडीच्या तुलनेने ती कमी पडत असल्याने दरड हटविण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

या कोसळलेल्या दरडीसंबंधीचा तांत्रिक अहवाल द्यावा, असे पत्र पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम खात्याला दिले आहे. त्यानंतर काल संध्याकाळी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते ज्युट कार्व्हालो यांनी मालपे व महाखाजन येथे कोसळलेल्या दरडीची पाहणी केली. ज्युट कार्व्हालो म्हणाले, की महामार्गासाठी आवश्यकतेनुसार आमच्याकडे जमीन नाही. त्यामुळे मार्गालगतच संरक्षक भिंत उभारलेली आहे.

आणखी दरड कोसळण्याची शक्यता

राष्ट्रीय महामार्ग करताना महामार्गाच्या दोन्ही बाजूचे डोंगर निमुळते न कापता ते उभे कापल्याने जोरदार पावसात आणखी दरडी कोसळण्याचा धोका आहे. संरक्षक भिंत बांधताना त्याचा पाया रुंद केला नसल्याने या संरक्षक भिंतीला आधार नाही. त्यामुळे दरड कोसळल्यानंतर संरक्षक भिंतही कोसळते, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

Pernem Retaining Wall Collapsed
Haihaya King Ruled Goa: ऐतिहासिक गोव्यावर होती हैहय राजघराण्याची सत्ता; नवी माहिती प्रकाशात

मालपे येथे याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे दरड कोसळली होती. महाखाजन येथे यंदा दुसऱ्यांदा दरड कोसळली. दोन वर्षांपूर्वी पोरस्कडे येथे महामार्ग नदीत गेला. पावसाळ्यात मालपे येथे भुयारी मार्गात पाणी भरून वाहतुकीला व्यत्यय येतो.

उगवे, महाखाजन येथेही सदोष बांधकामासंबधी तक्रारी आहेत. त्यासाठी हे काम पाहणाऱ्या साहाय्यक अभियंत्याला निलंबित करावे, कंत्राटदाराला काळ्या यादीत घालणे गरजेचे आहे. याबाबत आम्ही सर्व संबंधितांना न्यायालयात खेचणार आहोत.

- ॲड. जितेंद्र गावकर, काँग्रेस प्रदेश सचिव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com