Panaji News : पणजी बालसाहित्याची उपासना करणारा साहित्यिक हा कोणतेही आव्हानात्मक शिवधनुष्य पेलू शकतो. कोणत्याही भाषेतील साहित्याची उंची त्या भाषेत असलेल्या बालसाहित्यावरून ठरते.
मोठ्या माणसाने मुलांना चांगला मार्ग दाखवण्यासाठी गुगल गुरुऐवजी बालकथांची वाट दाखवायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी केले.
गोमंतक साहित्य सेवक मंडळाने गोमंतकीय साहित्यिकांकडून बालकथा मागवून त्यांचा ‘मुले देवाघरची फुले’ हा प्रातिनिधिक बालकथासंग्रह काढला. या कथासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी प्रमुख अतिथी या नात्याने डॉ. कोमरपंत बोलत होते.
यावेळी गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, पुस्तकावर भाष्य करणाऱ्या प्रा. सारीका आडवीलकर, कवयित्री शीतल साळगावकर, राजमोहन शेट्ये हे उपस्थित होते. डॉ. कोमरपंत पुढे म्हणाले की गोमंतक साहित्य सेवक मंडळाने माधव गडकरी यांच्या नंतर प्रातिनिधिक कथा, कविता, बालकविता, बालकथासंग्रह काढण्याचा स्तुत्य उपक्रम केला आहे. त्याचे हे कार्य कौतुकास्पद आहे, तसेच ऐतिहासिक आहे.
प्रा. सारीका आडवीलकर म्हणाल्या की, या प्रातिनिधिक बालकथामधून गोमंतकीय साहित्यिक रसिकांना बालसाहित्याकडे बघण्याची वेगळी दष्टी मिळेल. शीतल साळगावकर यांनी आपले दिवंगत वडील दत्तात्रय नार्वेकर यांच्या नावाने हे पुस्तक काढून देण्याची संधी मंडळाने दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
अध्यक्ष रमेश वंसकर यांनी प्रास्ताविक केले. राजमोहन शेट्ये यांनी सूत्रसंचालन केले. सुहास बेळेकर, विनोद नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. चित्रा क्षीरसागर यांनी आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.