Verna IDC Fire: वेर्णा औद्योगिक वसाहतीत भीषण आग; सुक्या गवताला लागलेल्या आगीत 30 कार जळून खाक Watch Video

Verna IDC Car Service Centre Gutted in Fire: 'रेनो' कंपनीच्या कार पार्क केलेल्या मैदानावर सुक्या गवताला आग लागून ३० गाड्या भस्मसात झाल्या.
Verna IDC Fire: वेर्णा औद्योगिक वसाहतीत भीषण आग; 30 कार जळून खाक, लाखोंचे नुकसान Video
Verna IDC Car Service Centre Gutted in FireDainik Gomantak
Published on
Updated on

वेर्णा: औद्योगिक वसाहतीत भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. वेर्णातील रेनो आणि स्कोडाच्या सर्व्हिस सेंटरला ही आग लागल्याने, जवळपास तीस कार जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत, आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

गवताला लागलेली आग पुढे पसरून बस जळल्याची घटना नुकतीच कुचेलीत घडली होती. त्याची पुनरावृत्ती मंगळवारी (२१ जानेवारी) वेर्णा येथे झाली. 'रेनो' कंपनीच्या कार पार्क केलेल्या मैदानावर सुक्या गवताला आग लागून ३० गाड्या भस्मसात झाल्या.

Verna IDC Fire: वेर्णा औद्योगिक वसाहतीत भीषण आग; 30 कार जळून खाक, लाखोंचे नुकसान Video
Mahadayi Water Dispute: म्हादईबाबत भाजप सरकार टाईमपास करतंय, सभापतींच्या वक्तव्याने सिद्ध; विरोधी पक्षनेते युरी आलेमाव
Verna IDC Fire
Verna IDC FireDainik Gomantak

याबाबत अधिक माहिती अशी की, रेनो कंपनीचे शोरूम वेर्णा येथे आहे. त्यांच्या नवीन कार समोरील मैदानात पार्क केलेल्या असतात. दुपारच्या सुमारास मैदानावरील सुक्या गवताला आग लागली.

Verna IDC Fire: वेर्णा औद्योगिक वसाहतीत भीषण आग; 30 कार जळून खाक, लाखोंचे नुकसान Video
Goa Politics: 'भाजपने विश्वासघात आणि अपमान केला'; गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खदखद
Verna IDC Fire
Verna IDC FireDainik Gomantak

ती पसरत कार पार्क केलेल्या जागी पोहोचली व कारनीही पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु ३०हून अधिक कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com