Sexual Assault Case: 9 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, 65 वर्षीय नराधम गजाआड; फळे देण्याच्या बहाण्याने कुकर्म

Maina Curtorim sexual assault case: आजोबा शोभेल, अशा वयाच्या एका नराधमाने एका नऊ वर्षीय मुलीला वासनेची शिकार बनवल्याची किळसवाणी घटना मायणा कुडतरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली.
Maina Curtorim sexual assault case
Maina Curtorim sexual assault caseDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: आजोबा शोभेल, अशा वयाच्या एका नराधमाने एका नऊ वर्षीय मुलीला वासनेची शिकार बनवल्याची किळसवाणी घटना मायणा कुडतरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद रफीक शेख या ६५ वर्षीय संशयिताला अटक केली आहे.

कुकर्म करून तो आपल्या मूळ गावी कर्नाटकात रेल्वेतून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, मडगावच्या रेल्वे स्थानकाजवळ पोलिसांनी काल मंगळवारी रात्री त्याच्या मुसक्या आवळल्या.

Maina Curtorim sexual assault case
Goa Theft: चाकूचा धाक दाखवून बाणावलीत डॉक्टरला  लुटले, दीड लाखांचा ऐवज पळविला

संशयितावर पोलिसांनी बीएनएस ६४ (१), ६५ (२), गोवा बाल कायदा कलम ८ (२) व पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वेरॉनिका कुतिन्हो पुढील तपास करीत आहेत.

संशयित फळविक्रेता असून, तो गेले अनेक दिवस त्या मुलीला फुकटात फळे देत होता. काल मंगळवारीही त्याने तिला फळे घेऊन जा म्हणून बोलावले व एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणामुळे परिसरात संताप पसरला असून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे.

Maina Curtorim sexual assault case
Goa Accident Death: 98 दिवसांत 66 जणांचे बळी, दर तिसऱ्या दिवशी एक मृत्यू; 80 टक्के अपघातांत दुचाकी

जागृत नागरिकामुळे प्रकरण उघड

ज्या ठिकाणी हा बलात्कार झाला, तेथील एका जागृत नागरिकाने ही घटना उघडकीस आणून, त्यासंबंधी बिगर सरकारी संस्था व पोलिसांना कळविल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. दक्षिण गोवा पोलिस अधिक्षक संतोष देसाई, सिद्धांत शिरोडकर व पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली एलआयबी पोलिस पथकाने लागलीच शोध मोहीम राबवून संशयिताला पकडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com