Chandor Robbery Case: कोयता दाखवत धमकावून चांदरमध्ये चोरले मोबाईल

पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या
Robbery
RobberyDainik Gomantak
Published on
Updated on

Four Accused Was Arrested In Chandor Robbery Case: आतापर्यंत रात्री-अपरात्री, तसेच दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या चोरांची मजल लोकांना धारदार शस्त्रे दाखवून लूटमार करण्यापर्यंत गेली आहे. याची प्रचीती दक्षिण गोव्यातील एका रहिवाशाला आली.

कोटा-चांदर येथे रेल्टन फर्नांडिस यांच्या घरात रात्रीच्या वेळी शिरून चौघाजणांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांचे दोन मोबाईल चोरले. याप्रकरणी शुक्रवारी मायणा-कुडतरी पोलिसांनी चौघाजणांना अटक केली आहे.

Robbery
Goa Agriculture Land: शेतकरी असाल, तरच मिळेल शेतजमीन; कृषी कार्डधारकांना लाभ

कृष्णकुमार, अस्लम शेख, गुलामी महंमद आणि रवींद्र चौधरी अशी या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी फर्नांडिस यांनी चार दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

चार दिवसांपूर्वी या चौघांनी मिळून चोरीच्या उद्देशाने फर्नांडिस यांच्या घराचे दार फोडून त्यांना कोयता दाखवून धमकावले. नंतर त्यांच्या दोन मोबाईलची चोरी केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान करून चौघांना अटक केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Colvale Central Jail Security
Marriage Promise Sexual Assault Case
Colvale Police Arrest 29 Year Old
Karnataka Tourist Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com