Mahavir Sanctuary: महावीर अभयारण्यात होणार खनिज हाताळणी, वनजमिनीचा वापर करण्यास परवानगी; पर्यावरणवाद्यांना धक्का

Mahavir Sanctuary mineral handling: राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने दक्षिण पश्चिम रेल्वेला भगवान महावीर वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीत लोह खनिज हाताळणीचे काम सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
Mahavir Sanctuary
Mahavir SanctuaryDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील पर्यावरणवाद्यांसाठी मोठा धक्का मानल्या जाणाऱ्या निर्णयात राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने दक्षिण पश्चिम रेल्वेला भगवान महावीर वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीत लोह खनिज हाताळणीचे काम सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

या मंजुरीनुसार अभयारण्य क्षेत्रातील कुळे येथील रेल्वे गोडाऊनसाठी ०.७६१६ हेक्टर वनजमिनीचा वापर करता येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही परवानगी अत्यंत कठोर

अटींअंतर्गत देण्यात आली असून जंगल परिसंस्था आणि वन्यजीवांवर होणारा संभाव्य परिणाम कमीत कमी ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

Mahavir Sanctuary
Goa Nightclub Fire: अजय गुप्ताला पाच दिवसांची पोलिस कोठडी, रजिस्टरमधील बनावट नोंदीचा वापर

या निर्णयामुळे संरक्षित क्षेत्रात लोखंडी धातूची हाताळणी शक्य होणार असून यामुळे दीर्घकालीन पर्यावरणीय परिणामांची भीती व्यक्त करत संवर्धनवादी आणि पर्यावरण संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. मंडळाने घालून दिलेल्या अटी असूनही या प्रकल्पामुळे अभयारण्याच्या जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे.

Mahavir Sanctuary
Goa Cristmas Celebration: नाताळनिमित्त राजधानीत विद्युत रोशणाई, चर्चस्क्वेअर परिसर सजला; राज्यात उत्साहाचे वातावरण

अटींचे काटेकोर पालन

दरम्यान, संबंधित यंत्रणांनी प्रकल्पाची अंमलबजावणी अत्यंत काटेकोर पर्यावरणीय सुरक्षाव्यवस्थांनुसारच केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

वन्यजीवांची हालचाल, जंगलाचे आच्छादन आणि अधिवासाची अखंडता बाधित होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल, तसेच एनबीडब्ल्यूएलने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन होत आहे की नाही यावर सातत्याने देखरेख ठेवली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com