arrested
arrested Dainik Gomantak

Panjim: ...यामुळे महाराष्ट्रातील 2 महिलांना गोवा पोलिसांची अटक

Panjim: प्रवाशी बसमधून महिलांचे दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना आगशी पोलिसांनी शिताफीने अटक केली.
Published on

Panjim: प्रवाशी बसमधून महिलांचे दागिने चोरणाऱ्या औरंगाबादच्या 2 महिलांना आगशी पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून 4 लाखांचे दागिने व रोख 15 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

चोरी करणारी संशयितांची टोळी गोव्यात आली असून त्यांचे आणखी काही साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती आगशी पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांनी दिली.

आगशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे श्रीशा काटगी (26) व काजोल काटगी (40) अशी आहेत. व त्या औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे राहत असल्याचे चौकशीत सांगितले आहे. महिला पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 6 सोन्याच्या बांगड्या व रोख रक्कम जप्त केली. त्या आणखी काही राज्यातील गुन्ह्यामध्ये गुंतलेल्या आहेत का याची चौकशी करण्यात येत आहे.

arrested
calangute: कळंगुटमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केली अटक

सापळा रचत अटक : पेडणे ते पिलार असा कदंब बसने प्रवास करणाऱ्या सरिता नाईक यांच्या पर्समधील मंगळसूत्र लंपास झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने यासंदर्भातची तक्रार आगशी पोलिसांत दिली होती. तपासादरम्यान काल सकाळी पोलिसांना दोन संशयास्पद महिला बांबोळी ते पिलार असा कदंबने प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला व त्यांना ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com