Car Accident at Tonca-Panjim
Car Accident at Tonca-PanjimDainik Gomantak

Watch Video: धक्कादायक! पणजीत कारसह जळून एकाचा मृत्यू, वाहन महाराष्ट्र नोंदणीकृत

मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

Car Accident at Tonca-Panjim: पणजीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कार अपघातात कार जळून खाक झाली असून, यात असलेल्या एक व्यक्तीचा जळून मृत्यू झाला आहे. टोंका-पणजी येथे आज (16 मार्च) पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टोंका-पणजी येथे भरधाव कारने रस्त्यालगत पार्क केलेल्या चारचाकी वाहनांना जोराची धडक दिली. या अपघातात कारला भीषण आग लागली. तसेच, जवळपास असणाऱ्या दुसऱ्या वाहनांना देखील आग लागली. यात कारमध्ये असलेल्या व्यक्ती आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. अपघात झालेली कार महाराष्ट्र नोंदणीकृत आहे. या अपघातात संबधित कार व इतर कारचे देखील नुकसान झाले आहे.

दरम्यान, घटनास्थळी पोलिस व अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तसेच, अपघातग्रस्त कारमधून मृत व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू आहे.

कार भरधाव आल्यानंतर रस्त्यालगत पार्क केलेल्या इतर कारना धडकली व आगीचा भडका उडाला. यात संबधित कार व त्याठिकाणी असलेल्या इतर कार देखील आगीत सापडल्या. असे स्थानिकांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com