गोव्यात राजकारणाला यूटर्न, TMC-MGP एकत्र

महाराष्ट्र गोमंतक पक्षाने (MGP) सोमवारी, 6 डिसेंबर रोजी पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) तृणमूल काँग्रेससोबत (Trinamool Congress) निवडणूकपूर्व युती करण्यास होकार दिला आहे.
Pandurang Deepak Dhavalikar & Mamata Banerjee
Pandurang Deepak Dhavalikar & Mamata BanerjeeDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र गोमंतक पक्षाने (MGP) सोमवारी, 6 डिसेंबर रोजी पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) तृणमूल काँग्रेससोबत (Trinamool Congress) निवडणूकपूर्व युती करण्यास होकार दिला आहे. एमजीपीचे अध्यक्ष पांडुरंग दीपक ढवळीकर (Deepak Dhavalikar) यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, दोन्ही पक्षांनी गोव्यातील (Goa) जनतेला सुशासन देण्यासाठी हातमिळवणी केली आहे. राज्यात भाजपच्या विरोधात लाट आहे. लोकांना बदल हवा आहे, आणि आम्ही राज्यात सरकार स्थापन करु शकू," ढवळीकर पुढे म्हणाले की, MGP केंद्रीय समितीने एकमताने TMC सोबत निवडणूकपूर्व युती करण्याचा निर्णय घेतला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 3 जागा जिंकलेल्या MGP ने TMC कडे 12 जागा मागितल्या आहेत आणि मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचा तपशील नंतर ठरवला जाईल.

Pandurang Deepak Dhavalikar & Mamata Banerjee
TMC-AAPने तापवले गोव्याचे राजकीय वातावरण! काँग्रेस-भाजप तणावात

दरम्यान, "टीएमसीने 12 जागांसाठी तत्वतः सहमती दर्शविली आहे. 13 डिसेंबर रोजी ममता बॅनर्जींच्या भेटीदरम्यान सर्व अटी मान्य झाल्यास आम्ही एकत्र युतीची घोषणा करू शकतो," असेही यावेळी ढवळीकर म्हणाले.

दीपक ढवळीकर पुढे म्हणाले की, एमजीपीकडे युतीसाठी भाजपशिवाय पर्याय नाही, असा आभास निर्माण केला जात आहे. आम्ही नेहमीच भाजपवर टीका केली आहे. भाजप वगळता काँग्रेस, आप आणि टीएमसीसह सर्व पक्षांशी चर्चा करत होतो."

दरम्यान, TMC प्रमुख ममता बॅनर्जी 13 डिसेंबर रोजी गोव्याला भेट देणार आहेत. TMC सुप्रिमो यांचे पुतणे आणि पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) त्यांच्यासोबत असणार आहेत.

भाजप- कॉंग्रेस यांच्या अडचणीत वाढ

टीएमसी आणि एमजीपी यांच्या युतीमुळे भाजप आणि कॉंग्रेस यांच्या कोट्यात चिंतेचे वातावरण निर्माण झालेे आहे. टीएमसी गोव्यात हळूहळू आपला राजकीय रंग दाखविण्यास सुरुवात करत असल्याने येणाऱ्या काळात आप देखील या दोघांसोबत भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सामील होतो का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. जर असे झाल्यास येणारी निवडणूक कॉंग्रेस आणि भाजपसाठी नक्कीच कसोटीची ठरणार आहे. तिसऱ्या आघाडीबाबत तृणमुलच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी महाराष्ट्रात शरद पवारांची भेट घेत याबद्दल भाकित केले होते त्यानुसार त्याचा चित्रपट MGP रुपाने आपल्याला दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com