Mahadayi Water Dispute: आरजी ही भाजपची ‘बी टीम’

आरजीची कृती जनआंदोलनात फूट पाडणारी आणि सौम्य करणारी आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे सहसंयोजक समील वळवईकर यांनी केला.
Mahadayi water dispute in Goa
Mahadayi water dispute in Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi Water Dispute: गोव्याची जीवनदायिनी म्हादईच्या संरक्षणासाठी आम्ही सगळ्यांनी एकजूट होऊन लढण्याची गरज आहे, परंतु रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजीपी) म्हादईच्या मुद्यावर गोमंतकीयांचा एकजूट असलेला आवाज तोडत आहे.

आरजीची कृती जनआंदोलनात फूट पाडणारी आणि सौम्य करणारी आहे. त्यामुळे आरजी हीच भाजप सरकारची ‘बी टीम’ आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे सहसंयोजक समील वळवईकर यांनी केला.

पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे नेते तनोज अडवलपालकर आणि संतोष मांद्रेकर उपस्थित होते.

म्हादईची लढाई जिंकायची असेल, तर मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. म्हादईचा मुद्दा कोणत्याही एका पक्षाचा होऊ शकत नाही. गोमंतकीयांच्या हक्कासाठी आपण एकत्र येऊन लढणे आवश्‍क आहे.

आरजी म्हादई चळवळीचा वापर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करत आहे. आरजी प्रमुख मनोज परब आपल्या आईला वाचवण्यासाठी आंदोलनात सामील होऊ शकत नसतील, तर ते गोव्यासाठी काय करणार, असा प्रश्‍न वळवईकर यांनी केला.

Mahadayi water dispute in Goa
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल- डिझेलच्या किमतीत बदल, जाणून घ्या आजचे दर

सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. आरजी हा एकमेव पक्ष आहे ज्याने झारखंड - बंगाल राज्याच्या पाणी वादावर प्रकाश टाकून तृणमूल काँग्रेसवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे.

Mahadayi water dispute in Goa
Goa Agriculture: गोव्यातील ऊस उत्पादकांचा सरकारकडून विश्वासघात

अशी विधाने करून ते जनतेला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आरजी केवळ तेच म्हादईसाठी लढत असल्याचे, तर उर्वरित गोवा झोपेत असल्याचे चित्र उभे करत आहे आहे, असे वळवईकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com