Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak

Mahadayi Water Dispute: म्हादई आंदोलनात असलेल्‍यांची गळचेपी ?

‘म्हादई बचाव’ आंदोलनात सक्रीय असल्यामुळेच सरकारने राजदीप यांचे नाट्यप्रयोग तातडीने बंदचा आदेश दिला असल्याचे बोलले जात आहे.
Published on

Mahadayi Water Dispute: नव्या शैक्षणिक धोरणावर आधारित ‘काणी नव्या युगाची’ या राजदीप नाईक यांच्या नाटकाचे गोवा सरकारच्या माहिती खात्याने पुरस्कृत केलेले 12 प्रयोग सध्या स्थगित ठेवावेत असा तातडीचा आदेश माहिती खात्याने जारी केल्याने तो वादाचा विषय ठरला आहे.

दरम्‍यान, आपण ‘म्हादई बचाव’ आंदोलनात सक्रीय असल्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतल्‍याची शक्‍यता नाईक यांनी व्यक्त करून सरकारने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, याबाबत कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

Mahadayi Water Dispute
Goa Petrol-Diesel Price : गोव्यात येण्याचा विचार करताय? मग आधी जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

राजदीप नाईक यांचे ‘काणी नव्या युगाची’ हे नाटक सध्या चर्चेचा विषय ठरले असून राज्यातील बाराही तालुक्यांत नाटकाचे प्रयोग होणार होते. सरकारपुरस्कृत नाटकाचा पहिला प्रयोग मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात झाला.

गेल्‍या शनिवारी पेडणे तालुक्यातील हळर्ण येथे नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आला होता. मात्र त्यांना त्यादिवशी माहिती खात्यातून एक मेल आला. त्यात पुढील प्रयोग स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले होते.

याबाबत राजदीप नाईक म्‍हणाले की, आपण माहिती खात्याशी संपर्क साधला. मुख्यमंत्री कार्यालयात कुणीतरी नाटकाविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे तूर्तास हे प्रयोग स्थगित ठेवण्यात आलेले आहेत.

आता माहिती खात्याला पत्र लिहून हा तक्रार करणारा कोण, याची माहिती मला द्यावी आणि नाटकाचे प्रयोग रद्द केल्याने आयोजक तसेच माझे झालेले नुकसान कोण भरून देणार याचाही सरकारने खुलासा करावा.

Mahadayi Water Dispute
Mahadayi Water Dispute: आता आम्‍ही मागे हटणार नाही; गोव्याला कर्नाटकचा इशारा

विर्डी येथे ‘म्हादई बचाव’ आंदोलनाची जी बैठक बोलाविली होती, त्या बैठकीला लोकांनी उपस्‍थित रहावे असे मी आवाहन केले होते. त्यामुळेच माझ्‍या नाटकाचे प्रयोग रद्द केले असावेत असे मला वाटते. - राजदीप नाईक, नाटककार

म्हादई आंदोलनात सक्रिय असलेल्यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. तसे नसल्यास या नाटकाच्या प्रयोगांवर जी स्थगिती आणलेली आहे, ती ताबडतोब उठवावी. या प्रकाराचा मी निषेध करतो. - विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com