Mahadayi Water Dispute : म्हादईप्रश्‍नी अधिवेशनात 19 जानेवारीला चर्चा; वाढीव कालावधी नाहीच

सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधकांची मागणी फेटाळली, विरोधी पक्षांकडून सरकारवर टीकेची झोड
Mahadayi Water Dispute Discussion in Assembly Session
Mahadayi Water Dispute Discussion in Assembly Session Dainik Gomantak
Published on
Updated on

मात्र, सभापती रमेश तवडकर आणि सरकारने ती फेटाळत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, १९ जानेवारी रोजी विशेष चर्चा होईल, असे सांगितले. त्यामुळे म्हादई प्रश्न सरकार गंभीर नाही, असा आरोप करत विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत.

आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी याविषयावर जोरदार चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, विरोधकांची मागणी सरकारकडून फेटाळण्यात आली. विरोधकांनी हे अधिवेशन केवळ चार दिवसांचे असून पाचवा दिवस ‘अधिकचा दिवस’ म्हणून वाढवावा आणि तो खासगी सदस्य दिवस असला तरी त्या दिवशी म्हादई या विषयावर चर्चा व्हावी, असेही म्हटले होते. मात्र, सरकारने सर्व मागण्या फेटाळल्या. ( Mahadayi Water Dispute)

Mahadayi Water Dispute Discussion in Assembly Session
Goa Petrol-Diesel Price : गोव्यात 'लॉंग ड्राईव्ह'ला जाण्याआधी तपासा इंधनाचे दर; वाचा आजची पेट्रोल-डिझेलची किंमत

गळचेपीचा मुद्दा : विधिकारदिनी; मुख्यमंत्री-विरोधी पक्षनेत्यांत जुंपली

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या आरोप प्रत्यारोपाने आजचा विधिकार दिवस चांगलाच गाजला. सरकारने विरोधकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली असा आरोप आलेमाव यांनी केला. यावर मुख्यमंत्र्यांनी ‘ही लोकशाही आहे आणि आपण आपली टीका करण्यास मोकळे आहात’, असे प्रत्युत्तर दिले.

विधानसभेत आज विधिकार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर विधीकार फोरमचे अध्यक्ष सभापती रमेश तवडकर, मुख्यमंत्री सावंत, विरोधी पक्षनेते आलेमाव, उपसभापती जोशुआ डिसुझा, विधानसभा कामकाजमंत्री नीलेश काब्राल आदी हजर होते.

कार्यक्रमाला माजी आमदार धर्मा चोडणकर, विष्णू प्रभू, सदानंद मळीक, विजयकुमार उसगावकर, संगीता परब, मोहन आमशेकर, ॲड. रमाकांत खलप, निर्मला सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कर्नाटकला पाठविली नोटीस

म्हादईप्रश्नी सरकार पूर्वीपासून गंभीर आहे. याबाबत कर्नाटक सरकारला राज्य सरकारच्या मुख्य प्रधान वनसंरक्षकांकडून नोटीस पाठवली आहे. तर जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्याकडे कर्नाटकासाठी मंजूर केलेला डीपीआर मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. याबरोबरच या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली जाईल.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

म्हादई वाचवा : दक्षिण गोव्यातून ५ हजार लोक जाणार साखळीला

मडगाव : म्हादईचा लढा आता उत्तर गोव्यापुरता सीमित राहिलेला नसून दक्षिण गोव्यातूनही आता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १६ जानेवारी रोजी ‘म्हादई वाचवा’ ही हाक देऊन साखळी येथे आयोजित सभेला दक्षिण गोव्यातून किमान ५ ते ६ हजार लोक उपस्थिती लावणार असल्याचे संकेत आहेत.

दुसरीकडे, म्हादईसाठी बाराही तालुक्यातील एसटी बांधवांना संघटित करून जनआंदोलन उभारून सरकारला जाग आणून देण्यासाठी उटा (युनायटेड ट्रायबल अलायन्स) समर्थ आहे. म्हादई वाचविण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी म्हादई वांते-सत्तरी येथे रविवारी सभेत केले.

मुख्यमंत्र्यांची दीर्घ वेळ चर्चेची तयारी

अगोदर ठरल्याप्रमाणे १६ जानेवारी रोजी विधानसभेचे कामकाज सुरू होईल. या वर्षातील हे पहिले अधिवेशन असल्याने त्याचदिवशी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई आपले अभिभाषण करतील. त्यानंतर उर्वरित तीन दिवसांत १९ रोजी म्हादई या विषयावर चर्चा होईल आणि ती दीर्घ वेळ करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शवली आहे, अशी माहिती सभापती कार्यालयातून मिळाली आहे.

सरकारकडून गोमंतकीयांची फसवणूक!

म्हादई चर्चेसाठी अधिकच्या दिवसाची मागणी फेटाळून लावल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. म्हादई प्रश्नावर सरकार गंभीर नसून सरकारने आज विधीकार दिनादिवशीच लोकशाहीची हत्या केल्याची टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी केली. तर ‘आप’चे नेते व्हेंझी व्हिएगस यांनी सरकार जनतेची फसवणूक करत आहे, असा आरोप केला.

२० रोजी लोकप्रतिनिधींची बैठक

म्हादईप्रश्नी चर्चा करण्यासाठी विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर २० जानेवारी रोजी राज्यातील सर्व विद्यमान आमदार, माजी आमदार आणि आजी-माजी खासदारांची बैठक बोलावली आहे, अशी माहिती विधानसभा कामकाज मंत्री नीलेश काब्राल यांनी आज दिली. या बैठकीचा अजेंडा हा म्हादईविषयी असून बैठकीत कोणकोणते विषय चर्चेला येतील, याबाबत सांगण्यात आले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com