Mahadayi Water Dispute: अन्याय घडो, कुठेही पेटून उठू आम्ही..म्हणत ‘म्हादई बचाव’ सभेला नागरिकांचा उत्सुर्त प्रतिसाद

साखळीतील ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’च्या म्हादईबचाव सभेला काणकोणमधून दोनशे नागरिक उपस्थित राहणार आहेत.
Mahadayi water |People's Response
Mahadayi water |People's ResponseDainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi Water Dispute: साखळीतील ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’च्या म्हादईबचाव सभेला काणकोणमधून दोनशे नागरिक उपस्थित राहणार आहेत. काल या संदर्भात चाररस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयाच्या सभागृहात बोलाविलेल्या बैठकीला सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शांताजी नाईक गावकर उपस्थित होते.

Mahadayi water |People's Response
Bondla Sanctuary In Goa: केंद्र सरकारची मंजुरी; ‘बोंडला’ बनविणार आणखी आकर्षक!

म्हादईचा विषय हा उत्तर गोव्यापुरता स्तिमित नाही. आजपर्यत अन्याय घडो, कुठेही पेटून उठू आम्ही, ही आजपर्यंतची काणकोणवासीयांची भूमिका राहिली आहे.

त्यासाठी म्हादई बचावाचा तीव्र लढा काणकोणमधून सुरू करण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून सहकार्य करण्याचे आवाहन जेष्ठ नागरिक शांताजी नाईक यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्र्यांनी सर्व पंचायतीना म्हादई समर्थनार्थ ठराव घेऊन पाठविण्यास सांगितले आहे. सरकारची ही नामुष्की आहे, गावडोंगरीचे सरपंच धिल्लन उर्फ यशवंत देसाई यांनी सांगितले.

म्हादईचा विषय न्यायालयात असताना कर्नाटकाने डीपीआर सादर करून त्याला प्राधिकरणाने मान्यता दिली, हे चुकीचे आहे. आजपर्यत कर्नाटक सरकार कर्नाटकी चाल खेळत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक व केंद्रातील नेत्यांना या बाबतीत ठणकावून सांगण्याची गरज विठोबा देसाई यांनी व्यक्त केली.

फक्त राजकीय पक्ष आपला स्वार्थ या म्हादईप्रश्नी साधू पाहत आहेत. पक्षाची सर्व बंधने बाजूला सारून या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन मोहनदास लोलयेकर यांनी केले.

अनंत अग्नी, प्रशांत नाईक, अजित पैंगीणकर, राजेंद्र देसाई, संदेश तेलेकर, नगरसेवक धिरज नाईक गावकर, पंच सतीश पैंगीणक, सतीश भट, शिरिष पै. दयानंद फळ देसाई यांनी आपले विचार व्यक्त केले.

Mahadayi water |People's Response
Mahadayi Water Dispute: लोकप्रतिनिधींचे म्हादईबाबत अज्ञान त्यामुळेच...

बस गाड्यांची व्यवस्था

’या साखळीतील म्हादई बाचावच्या सभेला काणकोणहून सहभागी होण्यासाठी तीन बस गाड्यांची व्यवस्था केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com