Mahadayi River: 'गोमंतकीयांनी राष्ट्रीय पक्षांना धडा शिकवण्याची वेळ आलीये'

भाजप, काँग्रेस आणि आप सर्व राष्ट्रीय पक्ष कर्नाटकात एक भाषा बोलतात आणि नंतर गोव्यात येऊन भलतीच विधाने करतात, असा आक्रमक पवित्रा आरजीचे मनोज परब यांनी घेतला.
Mhadayi River
Mhadayi RiverDainik Gomantak

Goa: राष्ट्रीय पक्षांकडून आपल्या राजकीय स्वार्थापायी गोमंतकीय जनतेचा वारंवार विश्‍वासघात केला जात आहे. भाजप, काँग्रेस आणि आप सर्व राष्ट्रीय पक्ष कर्नाटकात एक भाषा बोलतात आणि नंतर गोव्यात येऊन भलतीच विधाने करतात.

गोमंतकीयांनी या राष्ट्रीय पक्षांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असा आक्रमक पवित्रा आरजीचे मनोज परब यांनी घेतला. पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोबत सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर उपस्थित होते.

म्हादईचे सरक्षण करण्यात सत्ताधारी भाजप कमी पडला आहे. त्यांनी डबल इंजिनच्या नावाने गोमंतकीयांची फसवणूक केली आहे. डबल इंजीन सपशेल अपयशी ठरले असून कर्नाटकाच्या राजकीय फायद्यासाठी म्हादईची विक्री करण्यात आली आहे.

तसेच दुसरीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते कर्नाटकात जाऊन सरकार आल्यास म्हादई वळवण्यासाठी तीन हजार कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देण्याची आवश्‍यकता आहे.

Mhadayi River
Mahadayi River: आपल्याला जगवणाऱ्या म्हादईची गोष्ट !

तर गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सत्तेत असताना दिलेला निवाडा हा गोव्याचा विजय असल्याचे ट्विट केले होते. त्यामुळे या सगळ्यांवर विश्‍वास ठेवता येईल का? असा प्रश्‍न परब यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com