गोव्यातील राजकर्त्यांना पत्रकारांनी लेखणीद्वारे वठणीवर आणावे: मधु पालयेकर

कोरगाव येथील मिशन फॉर लोकल तर्फे पेडणे तालुक्यातील काही निवडक पत्रकारांचा कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल दखल घेवून सत्कार करण्यात आला.
Madhu Palayekar has stated that journalists should correct the rulers of Goa through writing
Madhu Palayekar has stated that journalists should correct the rulers of Goa through writingDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: पत्रकारांच्या (Journalist) लेखणीत जेवढी ताकत असते, तेवढी ताकत कुठ्याच आणखी क्षेत्रात नाही. पत्रकारांनी सत्य लिहावे आणि राजकर्त्याना जे चुकतात त्याना वठणीवर आणावे आणि भूमिपुत्रांचा आवाज पूर्ण गोव्यात पोचवण्याचे कार्य अविरतपणे करावे जनता तुमच्या बरोबर असेल असे उद्गार सामाजिक कार्यकर्त्ये मधु पालयेकर यांनी काढले.

मधु पालयेकर यांनी पुढे बोलताना मिशन फॉर लोकलचे कार्य राजन कोरगावकर करत आहेत ते कौतुकास्पद आहे. पत्रकारांनी भूमिपुत्राला सहकार्य करून त्याना एक लोकांची सेवा करण्याची एक संधी द्यावी असे आवाहन केले. महिलांच्या प्रगतीसाठी मिशन फॉर लोकलने काम करावे, पत्रकारांच्या लेखणीला जी ताकत आणि किंमत आहे ती कुणाला नाही. पैशाने जे काम होत नाही ते काम पत्रकारांच्या लेखणीतून होवू शकतो असा विश्वास व्यक्त केला. जनतेने आमदार म्हणून राजन कोरगावकर याना संधी देण्याचे आवाहन पालयेकर यांनी केली.

ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न सोडवणार; राजन कोरगावकर

पेडणे तालुक्यातील ग्रामीण पत्रकार अल्प मानधन घेवून अविरत काम करत असतात , त्यांचे प्रश्न समस्या कुणीही सोडवायला पुढे येत नाहीत. आपल्याला 2022 सालच्या निवडणुकीत जर यश मिळाले तर आपण ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मिशन फॉर लोकलचे कार्य याच पत्रकारांनी राज्यभर पोचवले. मिशन फोर लोकल सदैव पत्रकारासोबत असेल असे मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी सांगितले.

Madhu Palayekar has stated that journalists should correct the rulers of Goa through writing
Goa Politics: सावित्री कवळेकरांचा मुख्यमंत्र्यांकडून पत्ता कट

लोकशाहीचा आधार

पत्रकार हा लोकशाहीचा मोठा आधार आहे. जर मिडीया नसती तर जगात जे काही चाललय ते कसे कळणार होते. पत्रकारिता हे सत्कार्य आहे. अल्प मानधन घेवून पत्रकार आपले चुली कश्या पेटवतात हेच मोठे समाजासाठी योगदान असल्याचे ते म्हणाले.

पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांनी बोलताना आम्ही कोणतेही सत्कार्य केले नाही. मात्र आता सत्कारामुळे जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या सहकार्यातूनच पत्रकार काम करत असतो. ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न कोणी सोडवत नाही. पत्रकारांचे प्रश्न सरकारने सोडवण्याची गरज आहे. असे शिरोडकर म्हणाले. यावेळी पत्रकार प्रकाश तळवणेकर , मकबूल माळगीमणी, व महादेव गवंडी यांनी ग्रामीण भागातील पत्रकाराना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो याचे विवेचन केले. माजी सरपंच राजू नर्से यांनीही मनोगत व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com