ISI Exam : ‘आयएसआय’मध्ये मडगावचा अनंत केरूर 39 वा

देशभरातून सुमारे 50 हजार विद्यार्थी दरवर्षी या प्रवेश परीक्षेला बसतात.
Anant Kerur
Anant KerurDainik Gomantak
Published on
Updated on

प्रतिष्ठेच्‍या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट (आयएसआय)च्या प्रवेश परीक्षेत मडगावचा विद्यार्थी अनंत केरुर याने विषेश चमक दाखवली असून या महत्त्‍वाच्‍या परीक्षेत देशभरातील विद्यार्थ्‍यांमध्‍ये 39 व्या क्रमांकासह त्‍याने ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

देशभरातून सुमारे 50 हजार विद्यार्थी दरवर्षी या प्रवेश परीक्षेला बसतात, मात्र गोव्यातील विद्यार्थ्यांनी अभावानेच या परीक्षेत अापली चमक दाखवली आहे. यापूर्वी 2015 मध्ये राजनाला सम्यक हिने 60वा अखिल भारतीय रँक मिळवला हाेता, 2018 मध्ये अभिषेक गर्ग याला 27 वा क्रमांक मिळाला होता. अलीकडच्या काळात हे दोनच विद्यार्थी गोव्यातून परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्‍यामुळे केरुर याचे हे यश लक्षणीय मानले जाते.

Anant Kerur
Goa News - धारगळ Highway Junction धोकादायक स्थितीत | Gomantak TV

अनंत हा मरीन अभियंते उमेश केरूर आणि गृहिणी असलेल्‍या वंदना केरूर यांचा मुलगा आहे. आयएसआय ही प्रवेश परीक्षा 14 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती आणि 8 जुलै रोजी निकाल लागला होता. आयएसआयमधून गणित विषयातील पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थी सहसा विश्लेषण, संशोधन आणि वित्त यांसारख्या क्षेत्रांमध्ये उच्च श्रेणीच्या नोकऱ्या मिळवतात.

आयएसआय प्रवेश परीक्षेत मी 39वा अखिल भारतीय रँक मिळवला याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे.स्टेलर अकादमी मधील माझ्या शिक्षकांचे मी नेहमी मला त्‍यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल आभारी आहे आणि ते मला कधीही मदत करण्यास तयार होते. त्यांनी मला अशा कठीण परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या स्तरासाठी प्रशिक्षण दिले. मी आता संस्थेच्या बेंगळुरू कॅम्पसमध्ये सामील होण्यास उत्सुक आहे. - अनंत केरूर

Anant Kerur
Goa News - मयेतील मूर्तीकारांना मिळाली चिकणमाती मळायची यंत्रे | Gomantak TV

अखिल भारतीय स्तरावर दुहेरी अंकात रँक मिळवणे कधीच सोपे नसते, विशेषतः विज्ञान आणि गणिताशी संबंधित स्पर्धा परीक्षांमध्ये. आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आमच्यासाठी तसेच गोव्यातील एकंदर विद्यार्थ्यांसाठी हा एक मैलाचा दगड आहे. आमच्या इतर विद्यार्थ्यांना हा निकाल अधिक चांगली कामगिरी करण्यास प्रवृत्त करेल, इतरांनाही प्रेरणादायी असे अनंत केरूर याने यश मिळवले आहे, इतरही त्यातून प्रेरणा घेतील अशी आशा आहे.

- योगेंद्र सिंग सिकरवार, एस्टेलर अकादमीचे संस्थापक संचालक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com