Madgaon News : धावत्या कारवर पडला माड; चेन्नईयीन एफसीचे चार खेळाडू बालबाल बचावले

Madgaon News : ही घटना कोंब-मडगाव येथे रविवारी रात्री उशिरा घडली. सुदैवाने हा माड कारच्या आरशावर पडला.
Madgaon
MadgaonDainik Gomantak

Madgaon News :

मडगाव,धावत्या कारवर माड कोसळण्याची घटना काल रात्री उशिरा घडली. या कारमधून चेन्नईयीन एफसी क्लबचे चार खेळाडू प्रवास करीत होते.

मात्र त्‍यांचे दैव बलवत्तर असल्‍यामुळे ते बालबाल बचावले. वाहन चालकाने दाखविलेली दक्षता त्‍यांना मृत्‍यूच्‍या दाढेपासून

वाचविणारी ठरली.

ही घटना कोंब-मडगाव येथे रविवारी रात्री उशिरा घडली. सुदैवाने हा माड कारच्या आरशावर पडला. या कारमधून चेन्नईयीन एफसी क्लबचे चार खेळाडू प्रवास करीत होते. वाहन चालकाच्या दक्षतेमुळे हे खेळाडू बचावले.

काल फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर चेन्नईयीन एफसी आणि एफसी गोवा यांच्यात सामना होता. घरच्या मैदानावरील हा सामना एफसी गोवाने जिंकला. या सामन्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. किरण कदम हा टॅक्सीचालक या खेळाडूंना फातोर्डा स्टेडियमवरुन घेऊन बाणावली येथे एका रिसोर्टमध्ये जात होता.

Madgaon
Goa Congress: भाजपचे धोरण 'मिशन टोटल कमिशन'; हाच का मोदींचा विकसीत भारत? खलप यांचा सवाल

कार घेऊन जात असताना अचानक कोंब येथे माड कारवर कोसळला. तो कारच्या आरशावर पडला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. देवाच्या कृपेने मोठा अनर्थ टळला असे कदम याने सांगितले.

धोकादायक माड

राज्‍यातील बहुतांश रस्‍त्‍यांच्‍या कडेला माड आढळतात. अनेकदा नारळ अंगावर पडल्‍याने जखमी होण्‍याच्‍या घटनाही घडल्‍या आहेत. कोंब येथे घडलेला प्रकारही धक्‍कादायक आहे.

म्‍हणूनच महत्त्‍वाच्‍या रस्‍त्‍यांनजीक असलेल्‍या झाडांची सरकारी खात्‍याकडून पाहणी होणे गरजेचे आहे. त्‍यामुळे वाहतुकीस धोकादायक ठरणाऱ्या झाडांच्‍या फांद्या वा धोकादायक माड यंत्रणेच्‍या लक्षात येतील. त्‍यावर उपाय योजण्‍यात येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com